Take a fresh look at your lifestyle.

‘पारनेर’प्रकरणी अण्णा हजारेंनी म्हटलेय ‘असे’; पहा तहसीलदार देवरे यांनी काय केलाय दावा

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी थेट पत्रकारांसमोर आपली भावना व्यक्त करताना संबंधित सुसाईड नोट ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याबद्दल स्पष्टीकरण देताना अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांना व्यक्त केलेल्या भावनेबद्दल त्यांनी स्पष्ट माहिती दिली आहे.

Advertisement

देवरे यांनी म्हटले आहे की, भावाने ऑडीओ क्लिप एका पत्रकार मित्राला दिली आणि मग ती व्हायरल झाली. चौकशी अहवालाला घाबरून मी हे केलेले नाही. दबाव व भीती यामुळे नकारात्मक विचार करून ते लिहिले होते. मी कोणाचेही नाव घेतलेले नाही व घेणार नाही. कुटुंबाची जबाबदारी लक्षात आल्यावर मी यातून सावरले. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष अनिता पाटील यांच्याकडे संपर्क केला. पाटील यांनी समुपदेशन केले.

Advertisement

त्यांनी पुढे म्हटले आहे की, नैराश्यातून बाहेर आल्यावर मी कामाला सुरुवात केले आहे. अण्णा आजारे यांनी १०-१२ वेळा फोन केले. मात्र, आईकडे माझा फोन बंद असल्याने त्यांच्याशी लगेच संपर्क झाला नाही. मग अण्णांची भेट घ्यायला गेले. अण्णांनी नाराजी व्यक्त केली. हिम्मतवान अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे साहेबांचा आदर्श घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. अण्णांना मी सांगितले की, महिला असल्याने अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाल्यावर त्या मनस्थितीत काही घडले. अण्णांना माझी विचारशक्ती कशी कुंठीत झाली होती हे सांगितले. तसेच लढण्याचा अण्णांना शब्द दिला.

Advertisement

See Video On पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे प्रथमच कॅमेऱ्यासमोर… केला ‘हा’ गंभीर आरोप…video (mahanagarnews.com) This Link

Advertisement
Advertisement

Leave a Reply