Take a fresh look at your lifestyle.

संजय राठोड यांना ‘क्लिन चिट’, महिलेच्या आरोपांबाबत नवा ट्विस्ट, पोलिस तपासात भलतंच आलं समोर..

यवतमाळ : शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला होता. मात्र, आता या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट समोर आलाय. यवतमाळ पोलिसांच्या तपासात या आरोपात कोणतेही तथ्य समोर आले नाही. त्यामुळे पोलिसांनी संजय राठोड यांना ‘क्लिन चीट’ दिली आहे.

Advertisement

संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार एका महिलेने पोस्टाने घाटंजी पोलिस ठाण्यात पाठवली होती. या आरोपांची चौकशी करण्यासाठी ‘एसआयटी’ (विशेष चौकशी पथक) नेमण्यात आली. पीडित महिलेचा जबाब नोंदविण्यात आला. नंतर संजय राठोड यांचाही 14 तारखेला जबाब नोंदविला होता.

Advertisement

पोलिसांना दिलेल्या जबाबात संबंधित महिलेने आपण असे कोणतेही पत्र घाटंजी पोलिस ठाण्यात पाठविलेच नसल्याचे सांगितले. एवढंच नाही, तर अर्जावरील सहीही त्यांची नाही, त्यांच्या पतीचे नावही खोटे टाकलेले आहे. त्यांची राठोड यांच्याविषयी कोणतीही तक्रार नव्हती. त्यांच्या नावाने कुणीतरी खोडसाळपणे ‘स्पीड पोस्टा’ने हा अर्ज पोलिसांना पाठविल्याचे समोर आल्याचे पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी सांगितले.

Advertisement

संबंधित महिला वा त्यांच्या कुटुंबाचा या अर्जाशी काही एक संबंध नाही. अर्जात नमूद करण्यात आलेल्या बाबी संपूर्ण खोट्या व निराधार असल्याचे निष्पन्न झाले. ज्या पोस्टातून हे पत्र पंजीकृत करण्यात आले, तेथेही चौकशी करण्यात आली आहे. इतर साक्षीदार वा ज्यांची नावे पत्रात नमूद केलेली होती, त्या सगळ्यांचे जबाब घेतले आहेत.

Advertisement

राठोड यांच्याविरोधातील तक्रार आणि आरोप हे संपूर्णपणे खोटे व बिनबुडाचे असून, त्यात कोणतेही तथ्य नसल्याची बाब विशेष चौकशी पथकाने नमूद केली आहे. त्यामुळे यवतमाळ पोलिसांनी राठोड यांनी क्लिन चिट दिल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

सोने-चांदीच्या भावात घसरण, नफावसुली भोवली..! सराफ बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..
नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा, मोदी सरकार भरणार या वर्षापर्यंत पीएफ रक्कम..

Advertisement
Advertisement

Leave a Reply