Take a fresh look at your lifestyle.

तालिबानची आर्थिक कोंडी..! जागतिक संघटनांनी घेतला महत्वाचा निर्णय, देश चालविणे होणार मुश्किल..

अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य मागे घेतल्यावर काही दिवसांतच तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. अफगाणिस्तानात आता तालिबानी राजवटीच्या नव्या अध्यायाला सुरुवात होण्याच्या दिशेने पावले पडत असताना, जागतिक संघटनांनी तालिबानची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

Advertisement

भविष्यात इतर देशांशी व्यवहार करण्यासाठी तालिबानला परकीय चलनाची गरज पडेल. सध्या तालिबानकडे परकीय चलनाचा छदामही नाही. त्यात जगभरातील सदस्य देशांना वेळोवळी कर्ज देणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने (आयएमएफ) तालिबानला कोणतेही कर्ज देण्यास नकार दिला आहे. तालिबान्यांना नव्याने कर्ज वा इतर कोणतीही मदत करणार नसल्याचे नाणेनिधी संघटनेने स्पष्ट केले आहे.

Advertisement

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे जगभरात १९० सदस्य देश आहेत. या संघटनेकडून विकसनशील, गरीब देशांना कर्ज स्वरूपात आर्थिक मदत केली जाते. आता अफगाणिस्तानावर तालिबानची सत्ता आली असली, तरी नाणेनिधीच्या मते अफगाणीस्तानातील तालिबान सरकारच्या मान्यतेबाबत जागतिक स्तरावर मतभिन्नता आहे. अफगाणिस्तानातील सत्ताबदलानंतर IMF ने ‘वेट अँड वॉच’चे धोरण स्वीकारले आहे. अन्य देशांसोबत सल्लामसलत केल्यानंतर तालिबानला कर्ज द्यायचे की नाही, याबाबत निर्णय घेऊ, अशी भूमिका IMF ने घेतली आहे.

Advertisement

तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळविला असला, तरी प्रत्यक्षात अफगाणिस्तानच्या तिजोरीत खडखडाट आहे. परकीय गंगाजळी शिल्लक नसल्याने तालिबानींची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. अफगाणीस्तानच्या केंद्रीय बँकेचे गव्हर्नर अजमल अहमदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की अफगाणिस्तान सरकारकडे ९ अब्ज डॉलरची राखीव गंगाजळी विदेशात आहे. ज्यात फेडरल रिझर्व्हचे बॉण्ड, सोने आहे. देशात एकही डॉलरची विदेशी मुद्रा रोख स्वरूपात उपलब्ध नाही.

Advertisement

ब्रिटनने ‘तालिबानला एकतर्फी मान्यता देणार नाही’ अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली असून, चीननेही मान्यतेबाबत सावध भूमिका घेतली आहे. कॅनडानेही तालिबानला लगेच मान्यता देण्यास नकार दिला आहे. अफगाणिस्तानातील नव्या सरकारला एकतर्फी नाही; तर आंतरराष्ट्रीय आधारावर मान्यता दिली जावी, अशी अपेक्षा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी बोलताना केली.

Advertisement

अफगाणिस्तानमधील राजकीय नेतृत्व आणि लष्करी अधिकाऱ्यांनी शरणागती पत्करल्याने तालिबानने पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. तालिबान सरकार स्थापनेसाठी हालचाल करत असताना दुसरीकडे अफगाण जनता रस्त्यावर उतरली आहे..

Advertisement

पावसाबाबत मोठी अपडेट, पुढील दोन आठवडे काय परिस्थिती असणार, हवामान विभागाने काय म्हटलेय पाहा..
पारनेर तहसीलदारांना ‘त्यांचा’ आधार; आमदार लंकेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष, पीडीएफही होतेय व्हायरल..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply