Take a fresh look at your lifestyle.

हुश्श.. अखेर त्या भारतीयांचा थांगपत्ता लागला; पहा नेमके काय चालू आहे काबूलमध्ये

दिल्ली : देशाच्या काळजाचा ठेक चुकवणारी बातमी तासाभरापूर्वी आली होती. कारण, सुमारे 150 जणांना अफगानिस्तानच्या तालिबानी (स्वयंघोषित) सरकारच्या सैन्याने विमानतळावरून बाजूला नेले होते. त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने अनेकांच्या काळजाचा ठेका चुकला होता. मात्र, ताज्या माहितीनुसार सगळेच सुरक्षित आहेत. त्यांच्या सर्वांचे पासपोर्ट व्हेरिफिकेशन सध्या चालू असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत अजूनही ठोस माहिती येणे बाकी आहे.

Advertisement

दरम्यान, अगोदरच्या बातम्यात म्हटले होते की, अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाताना तालिबानी अतिरेक्यांनी 150 जणांचे अपहरण केले आहे. त्यापैकी बहुतेक भारतीय नागरिक आहेत. या घटनेला स्थानिक माध्यमांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, अपहरण झालेले बहुतेक लोक भारतीय आहेत. परंतु त्यांच्यामध्ये अफगाणिस्तानचे नागरिक आणि अफगाणिस्तानमध्ये राहणारे शीख यांचाही समावेश आहे. भारतीयांना मारहाण झाल्याचेही वृत्त आहे. मात्र, या घटनेला अद्याप सरकारकडून दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, तालिबानने अफगाण माध्यमांशी केलेल्या संभाषणात भारतीयांच्या अपहरणाच्या बातम्यांचे खंडन केले आहे.

Advertisement

या सर्व लोकांचे काबूलमधील हमीद करझई विमानतळाजवळून अपहरण करण्यात आले आहे. एका सूत्राने अफगाणिस्तानच्या स्थानिक माध्यमांना (काबूल नाऊ) सांगितले की, तो कसा तरी त्याची पत्नी आणि काही इतरांसह पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याने सांगितले की हे सर्व 8 मिनी व्हॅनमध्ये बसले होते आणि सकाळचे 1 वाजले होते. हे लोक काबूल विमानतळावर प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना आत प्रवेश करता आला नाही.

Advertisement
Advertisement

Leave a Reply