Take a fresh look at your lifestyle.

तालिबान्यांच्या राज्यात भारतीय अडचणीत; पहा किती भारतीय अडकलेत आणि आता काय चालू आहे काबूलमध्ये

दिल्ली : सध्या काबूलमधून एक मोठी बातमी येत आहे. तालिबानी माथेफिरूंनी काबूल विमानतळावरून 150 लोकांना आपल्यासोबत नेले असून त्यात बहुसंख्य भारतीय आहेत. त्यांच्या लोकेशनबद्दल अद्याप काहीही माहिती नाही. या लोकांना नेण्यामागे तालिबानचा हेतू काय आहे हे देखील स्पष्ट नाही. विमानतळावरील अनागोंदीच्या कारणामुळे त्यांना दुसऱ्या गेटमधून आत नेण्यात आले असावे असाही अंदाज आहे. त्याचबरोबर काबूल विमानतळावरील गोंधळादरम्यान एका अफगाण मुलीचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.

Advertisement

Advertisement

तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानातही भारतीयांचे एअरलिफ्ट सुरू आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई दलाचे सी-130 विमानाने 85 भारतीयांना घेऊन काबूल विमानतळावरून आज सकाळी 10.30 वाजता उड्डाण केले आणि सध्या इंधन भरण्यासाठी ताजिकिस्तानमध्ये उतरले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आणखी 200 भारतीयांना आणण्याची तयारी केली जात आहे, यासाठी हवाई दलाचे सी-17 विमान स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे.

Advertisement

अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावासाच्या सर्व अधिकाऱ्यांना विमानातून हलवण्यात आले आहे, परंतु काबूलसह इतर शहरांमध्ये आणखी 1000 भारतीय अडकल्याचा अंदाज आहे. परराष्ट्र मंत्रालय त्यांचे स्थान आणि स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, कारण सर्व लोकांनी अजूनही भारतीय दूतावासाशी संपर्क साधला नाही. काबूलमधून भारतीयांना हवाई दलाच्या विमानांमध्ये आणले जात आहे. गेल्या मंगळवारी 120 पेक्षा जास्त लोक ग्लोबमास्टर C-17 वरून घरी परतले होते. यामध्ये काबूलमधील भारतीय दूतावासाचे अधिकारी, आयटीबीपीचे कर्मचारी आणि इतरांचा समावेश होता. यापूर्वी सोमवारीही 45 लोकांना विमानातून आणण्यात आले होते.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply