Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. हजारो लोक तळमळत असताना फ़क़्त ‘त्या’ एकीसाठी उडाले विमान; पहा अफगाणिस्तानात काय चाललेय ते

दिल्ली : सध्या अफगाणिस्तान नावाचा देश जागतिक बातम्यात झळकत आहे. त्या देशातील चांगल्या नाही तर मन हेलावून टाकणाऱ्या घटनांनी सगळेच हैराण आहेत. हजारो लोक हा देश सोडून जाण्यासाठी विमानतळावर तळमळत आहेत. अशावेळी एक विमान फ़क़्त एकाच महिलेला घेऊन उडाल्याने जगभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

Advertisement

Advertisement

इंग्लंडच्या रॉयल मरीनमध्ये कमांडो म्हणून काम केलेल्या पॉल पेन फार्थिंग नावाच्या एका व्यक्तीने याबाबतची पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. ते स्वतः लेखक असून त्यांना हजारो फॉलोअर्स आहेत. त्यांनी म्हटलेय की, त्यांची बायको अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर अडकून पडली होती. तिला वाचवण्यासाठी विमान गेले आणि एकटीला घेऊन थेट तिच्या नॉर्वे या देशाकडे रवाना झाले. पॉल यांनी याबाबतचा फोटो शेअर केला आहे.

Advertisement

हा एकटीला घेऊन जाणाऱ्या विमानाचा फोटो पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बायका-मुलांना वाचवण्यासाठी विमान उडवले जात असताना काबुल विमानतळावर हजारो नागरिकांना जगण्याचा संघर्ष करावा लागत आहे. आतापर्यंत अनेक विमाने फ़क़्त पाच-दहा अधिकारी किंवा त्यांच्या कुटुंबियांना घेऊन या देशातून रवाना झालेले आहेत. त्यामुळे मानवाधिकार संघटना आणि जागतिक महत्वाच्या संस्थांनी याकडे लक्ष देऊन असे मानवता विरोधी प्रकार रोखण्याची मागणी जगभरातून होत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply