Take a fresh look at your lifestyle.

पवारांना चंद्रकांतदादांनी दिलेय असे प्रत्युत्तर; पहा नेमके काय म्हटले राजकीय परिस्थितीबाबत

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि देशाच्या राजकारणातील एक प्रभावी व्यक्ती असलेले शरद पवार ही सत्ताधारी भाजप आणि त्यांची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दुखती नस आहे. त्यानुसार आता देशात विरोधकांची मोट बांधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला शह देण्यासाठी पवार प्रयत्नशील आहेत. त्यावर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक टीका केली आहे.

Advertisement

Advertisement

चंद्रकांतदादांनी म्हटले आहे की, पवार साहेब, मला हे जाणून अत्यंत आनंद झाला आहे की, आपण आपला महत्त्वपूर्ण वेळ काढून मोदीविरोधी पक्षांचे नेतृत्व करणे स्वीकारले. तुम्ही अगदी योग्य म्हणालात, सध्याचा काळ तुम्हा सर्वांसाठी अंधारमय झालेला आहे आणि पुढील निवडणुकांमध्येही तुम्हाला विरोधी पक्षातच बसायचे आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर भयंकर पूरस्थिती ओढवली, शेतीचे अतोनात नुकसान झाले, मात्र अजूनही तुमच्या सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत केली नाही. त्यांना आश्वासन आणि दुर्लक्ष याशिवाय तुम्ही काय दिले? यावरून तुमचे शेतकऱ्यांवरील प्रेम दिसून येते.

Advertisement

पुढे चंद्रकांत पाटलांनी म्हटलेय की, मोदी सरकारच्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. लाखो शेतकरी याचा लाभ घेत आहेत. जे तुम्हाला इतके वर्ष शेतकऱ्यांसाठी जे जमले नाही, ते मोदी सरकारने करून दाखवले. आदर्श लोकशाही कशी असावी हे मोदी सरकारच्या धोरणांकडे पाहून तुमच्या लक्षात आले असेल. लोकशाही कशी उभारली जाते आणि कशी नियंत्रणात ठेवली जाते, याचे उदाहरण जम्मू-काश्मीर आहे. तुम्हाला शक्य नसलेली प्रत्येक गोष्ट मोदी सरकारने अवघ्या ७ वर्षात करून दाखवली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply