Take a fresh look at your lifestyle.

रोहित पवारांनी काढली राज ठाकरेंच्या ‘त्या’ कर्तुत्वाची आठवण; पहा कसे दिलेय दणक्यात क्रेडीट..!

पुणे : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीतील दुटप्पी भूमिकांवर नेमके बोट ठेवण्याचे काम मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले होते. त्याचा म्हणावा असा फायदा तरीही भाजप-शिवसेना विरोधात असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांना झाला नाही. मात्र, त्याचीच आठवण काढून आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले आहे.

Advertisement

Advertisement

रोहित पवारांनी ट्विटरवर म्हटलेय की, राजसाहेब हे अद्भूत वक्तृत्व शैली असलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘लाव रे तो व्हिडिओ…’ च्या वादळी सभांमुळं उडालेली धूळ डोळ्यात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो. भाजपला दणक्यात डोक्यावर घेऊन राजकीयदृष्ट्या रक्तबंबाळ करण्याचे कार्य त्यावेळी राज ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या त्या सभा अजूनही अनेकजण सोशल मिडीयावर पाहत असतात.

Advertisement

Advertisement

त्याच राज ठाकरे यांनी आता भाजपच्या समवेत जाण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रवादीला डोक्यावर घेण्याचे ठरवेल आहे. त्यावरही रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटलेय की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर लगेच लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणायचं असेल तर एकच पर्याय होता, तो म्हणजे जातीयवाद वाढवणं! म्हणून विरोधकांनी विकासाऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय!

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply