Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादीने घातला मोदींच्या नावाचा गोंधळ; पहा आंदोलनाचा एकदम भन्नाट व्हिडीओ

पुणे : सध्या देशभरात महागाई नावाच्या संकटाशी भारतीय नागरिक दोन हात करीत आहेत. त्यातून दिलासा देण्याऐवजी आणखी करवाढ करून या महागाईचा भडका उडवण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकार करीत आहेत. त्यामुळे याच महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दणक्यात गोंधळ घातला आहे.

Advertisement

Advertisement

याबाबत पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, प्रधानसेवक नरेंद्रजी तुम्ही गोंधळाला या हो, निर्मला आक्का तुम्ही या जागराला या हो.. महागाईने ग्रस्त जनतेच्या यातनांकडे दुर्लक्ष करून झोपेचं सोंग घेणाऱ्या मोदी सरकारला जागं करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्वारगेट चौक येथे आयोजित जागरण गोंधळ.

Advertisement

सध्या हा व्हिडिओ अनेकजण शेअर करीत आहेत. जनतेच्या भावनेला हात घालताना पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने वेगळ्या स्टाईलने हे आंदोलन केले आहे. केंद्र सरकारला सद्बुद्धी येण्यासाठी हे आंदोलन केले असून महागाईच्या विरोधात महिलांचा रोष आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. केंद्र सरकारमुळे महिलांचे अर्थिक नियोजन कोलमडून गेले आहे. मोदी सरकारला आता सुबुद्धी यावी, अशी अपेक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply