Take a fresh look at your lifestyle.

नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा, मोदी सरकार भरणार ‘या’ वर्षापर्यंत पीएफ रक्कम..

नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेकांनी नोकऱ्या गमावल्या, काहींचे उद्याेग-धंदे बंद पडले. कोरोना काळात नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ज्यांनी या काळात नोकरी गमावली, त्यांच्या पीएफ खात्यात मोदी सरकार 2022 पर्यंत पीएफची रक्कम टाकणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या औपचारीक योजनेची घोषणा केली.

Advertisement

अर्थमंत्री सीतारामन यांनी म्हटले आहे, की कोरोना महामारीच्या काळात अनेकांना नोकरी गमावावी लागली. या सर्वांच्या EPFO ​​खात्यात 2022 पर्यंत मोदी सरकार PF योगदान देणार आहे. मात्र, EPFO ​​मध्ये रजिस्ट्रेशन असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच या सुविधेचा लाभ मिळणार आहे.

Advertisement

केंद्र सरकार 2022 पर्यंत नियोक्ता, तसेच कर्मचाऱ्यांच्या पीएफचा हिस्सा देईल, ज्यांनी नोकरी गमावली आहे, परंतु औपचारिक क्षेत्रातील छोट्या नोकऱ्यांमध्ये काम करण्यासाठी पुन्हा बोलाविण्यात आले आहे, ज्यांची यूनिट्स ईपीएफओमध्ये रजिस्टर्ड असतील, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.

Advertisement

‘कोरोनामुळे रोजगाराचे संकट मोठे आहे. त्यामुळे यंदा मनरेगाचे यंदाचे बजेट 60 हजार कोटी रुपयांवरून एक लाख कोटी रुपये केले असल्याचेही सीतारामण यांनी स्पष्ट केले.

Advertisement

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा, म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) अनेक दशकांपासून स्थान मिळालेले नाही. मोदी सरकारने या MSME ला योग्य मान्यता दिली. जी जागा या भागाला अनेक दशकांपासून मिळाली नव्हती, ती आता दिली आहे. भविष्यात ती आणखी चांगली केली जाईल.

Advertisement

गेल्या दोन वर्षांचा विचार करता, केंद्र सरकारने खूप वेगळ्या गोष्टी केल्या आहेत. सरकारने MSME ची व्याख्या अत्यंत लवचिक पद्धतीने बदलली आहे. अलीकडेच संसदेत एक विधेयक आणण्यात आले आहे ज्याचा थेट फायदा MSME क्षेत्राला होणार असल्याचेही सीतारामण यांनी स्पष्ट केले.

Advertisement

राष्ट्रवादीने घातला मोदींच्या नावाचा गोंधळ; पहा आंदोलनाचा एकदम भन्नाट व्हिडीओ
अदानी ग्रुपला मोठाच झटका; पहा सेबीने नेमका कशाला दाखवला लाल झेंडा..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply