Take a fresh look at your lifestyle.

सोने-चांदीच्या भावात घसरण, नफावसुली भोवली..! सराफ बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..

मुंबई : कोराेना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने आता हळूहळू अर्थव्यवस्था सावरू लागली आहे. त्याचा परिणाम सराफ बाजारावरही पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या शेवटी आज (शनिवारी) सोने-चांदीतील तेजीला ब्रेक लागला. सराफ बाजारात आज सोन्याचा भाव १९० रुपयांनी घसरला, तर कमॉडिटी बाजारात चांदी ४५० रुपयांनी स्वस्त झाली.

Advertisement

‘गुड रिटर्न्स’ (Good returns) वेबसाईटनुसार मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२१० रुपये इतका खाली आला होता. कालच्या (ता. 20) तुलनेत त्यात १९० रुपयांची घसरण झाली. गुरुवारीही (ता. 19) सोने ३७० रुपयांनी स्वस्त झाले होते. २४ कॅरेटचा भाव ४७१३० रुपये इतका झाला आहे.

Advertisement

दिल्लीत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६३०० रुपये होता. कालच्या तुलनेत त्यात १२० रुपयांची घसरण झाली. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०५०० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४६५० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८७१० रुपये आहे. कलकत्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६५०० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९२०० रुपये आहे.

Advertisement

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये काल (शुक्रवारी) चांदीचा भाव ६१२२७ रुपये प्रति किलोपर्यंत घसरला. बाजार बंद होताना तो ४२७ रुपयांच्या घसरणीसह ६१७०६ रुपयांवर स्थिरावला. बुधवारी (ता. 18) बाजारात नफावसुली झाल्याने सोन्याचा भाव १३९ रुपयांनी घसरला होता.

Advertisement

बाजार बंद होताना सोने ४७१४१ रुपयांवर स्थिरावले, तर चांदीलाही नफावसुलीचा फटका बसला. ‘एमसीएक्स’वर एक किलो चांदीचा भाव ६२७३५ रुपयांपर्यंत खाली आला. त्यात ७९४ रुपयांची घसरण नोंदविण्यात आली.

Advertisement

नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा, मोदी सरकार भरणार या वर्षापर्यंत पीएफ रक्कम..
राष्ट्रवादीने घातला मोदींच्या नावाचा गोंधळ; पहा आंदोलनाचा एकदम भन्नाट व्हिडीओ

Advertisement
Advertisement

Leave a Reply