Take a fresh look at your lifestyle.

पावसाबाबत मोठी अपडेट, पुढील दोन आठवडे काय परिस्थिती असणार, हवामान विभागाने काय म्हटलेय पाहा..

मुंबई : शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले असताना, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. मागील 4-5 दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सर्वदूर पावसाच्या सरी कोसळत आहेत.

Advertisement

महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील तीन आठवडे पावसाचा चांगला अंदाज वर्तविला आहे. पुढील दोन आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होणार आहे. मात्र, पावसाचा जोर कमी असेल. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा फायदा होणार असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Advertisement

उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात 20 ते 26 ऑगस्ट दरम्यान चांगल्या पावसाची शक्यता आहे. मुंबईसह दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात पावसाचा जोर कमी असेल. कोकणात चांगला पाऊस होऊ शकतो.

Advertisement

महाराष्ट्रात 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान सर्वदूर पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. मराठवाड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्रात वाऱ्यांचा वेग अधिक असेल. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत पावसाची रिपरिप सुरु असून, मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवली आहे.

Advertisement

पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर इतरत्र पावसाची रिपरिप बघायला मिळणारआहे. ह्या तिन्ही जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट ठेवण्यात आला आहे. ज्यात काही ठिकाणी 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतचा पाऊस बघायला मिळू शकतो. धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोलीत काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे तर इतरत्र जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात देखील चंद्रपूर आणि गडचिरोलीतील काही भागात मुसळधारेचा अंदाज आहे तर विदर्भातील इतर सर्व जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement

सोप्पंय की.. कार घ्यायला मिळेल मग मोठीच सूट; फ़क़्त गरज आहे ‘त्या’ सर्टिफिकेटची..!
‘त्या’ निर्णयाने ३३ हजार ८९५ शेतकऱ्यांना दिलासा; पहा नेमका काय निर्णय घेतलाय सरकारने

Advertisement
Advertisement

Leave a Reply