Take a fresh look at your lifestyle.

पारनेर तहसीलदारांना ‘त्यांचा’ आधार; आमदार लंकेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष, पीडीएफही होतेय व्हायरल..!

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ११ मिनिटांच्या ऑडिओ क्लिपद्वारे आपली सुसाइड नोट जाहीर केल्याच्या प्रकरणाने राजकीय गती घेतली आहे. याप्रकरणी राज्यात राष्ट्रवादीला झटका देण्यासाठी भाजप सरसावला आहे. त्यातच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी देवरे यांना आधार दिल्याने आमदार निलेश लंके यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

सर्व आरोप झाल्यावर आमदार लंके यांनी एक व्हिडिओ शेअर करून त्यांची भूमिका मांडली आहे. त्यात त्यांनी म्हटलेय की, भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असून चौकशीत देवेरे यांच्या कामात अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्याचा अहवाल मंत्रालयात क्षेल्यवर कारवाईच्या भीतीने त्यांनी ऑडिओ क्लिप बनवून बचावाचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. तहसीलदारांना सूचना केल्यावर त्यांनी मलाही यापूर्वी आत्महत्या करण्याचे मेसेज रात्री-अपरात्री केले होते. दरम्यान, तहसीलदार देवरे यांच्यावर कारवाई करण्याच्या शिफारशीच्या चौकशी अहवालाची एक ६ पानाची पीडीएफ पारनेर तालुक्यासह नगर जिल्ह्यात वेगाने व्हायरल होत आहे.

Advertisement

Advertisement

वनाधिकारी दीपाली चव्हाण यांचा संदर्भ देत आत्महत्या करावीशी वाटत असल्याचे महिला अधिकारी तहसीलदार देवरे यांनी ऑडीओ क्लिपमध्ये म्हटले होते. त्यामुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अहमदनगर भाजप याप्रकरणी आक्रमक झालेली आहे. तसेच एकटीच्या नाहीत तर शासकीय सेवेत काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या व्यथा प्रातिनिधिक स्वरूपात मांडल्या आहेत. मानसिक तणावाखाली नसून माझे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू आहे, असल्याचे सांगून देवरे यांनीही कर्तव्य बजावणार असल्याचा संदेश दिला आहे.

Advertisement

दरम्यान, ही ऑडीओ किल्प दहा दिवसांपूर्वीची असून दरम्यानच्या काळात देवरे यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसह, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचीही भेट घेऊन होणाऱ्या अन्यायाची माहिती दिल्याचे समजते. तरीही याप्रकरणी पुढे काहीही मध्यस्थी करून मार्ग काढण्यात आलेला नाही. उलट महिला आयोगाच्या सदस्या अनिता पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याजवळ त्यांनी व्यथा मांडली असतानाही कार्यवाही झालेली नाही. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह अनेकांनी देवरे यांना समजून घेऊन आधार दिल्यावर त्यांचे मतपरिवर्तन झाले आहे. व्यवस्थेला घाबरून पळ काढण्याऐवजी संघर्ष करण्याचा निर्धार देवरे यांनी व्यक्त केलेला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply