Take a fresh look at your lifestyle.

कमी भांडवलात सुरु करा ‘हा’ व्यवसाय, सरकारही देतेय मदतीचा हात, दर महिन्याला लाखो रुपयांची कमाई..!

मुंबई : ग्रामीण भागात एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार असेल, तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. शेतीपुरक व्यवसायातून दर महिन्याला मोठी कमाई करता येईल. ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून हमखास केला जाणारा व्यवसाय, म्हणजे कुक्कुटपालन..!

Advertisement

कमी भांडवलात व कमी जोखमीत कुक्कुटपालनाचा व्यवसाय करुनही बक्कळ पैसा मिळू शकतो. विशेष म्हणजे, कुक्कुटपालनाच्या व्यवसायासाठी सरकारकडून बिझनेस लोनवर 25 टक्के अनुदान मिळते. अनुसूचित जाती-जमातीसाठी या व्यवसायासाठी 35 टक्के अनुदान दिले जाते. त्यामुळे भांडवल उभारण्याचा भार हलका होतो.

Advertisement

अगदी लहान स्तरावर, म्हणजे 1500 कोंबड्यांपासून फक्त ५ ते ९ लाख रुपयांच्या भांडवलात हा व्यवसाय सुरु करता येतो. त्यातून महिन्याला लाखभर रुपये उत्पन्न मिळू शकते. कुक्कुटपालनासाठी मोठ्या जागेची गरज लागते. कोंबडीची पिल्ले विकत घेण्यासाठी साधारण पाच ते सहा लाख रुपये खर्च येतो. 1500 कोंबड्यांचे लक्ष ठेवले, तर तुम्हाला 10 टक्के जास्त पिल्लं खरेदी करावी लागतील. कोंबड्यांच्या विक्रीसोबतच तुम्ही अंडी विकूनही पैसे कमावू शकता.

Advertisement

सलग 20 आठवडे कोंबड्यांच्या देखभालीचा खर्च एक ते दीड लाख रुपये इतका होतो. कोंबड्यांची एक बॅच वर्षभरात साधारण 300 अंडी देते. 20 आठवड्यानंतर कोंबड्या अंडी द्यायला सुरवात करतात. तुमच्याकडे 1500 कोंबड्या असतील, तर 290 अंड्यांच्या हिशेबाने वर्षाला 4, 35,000 अंडी मिळतील. यापैकी चार लाख अंडी विकली तरी तुम्ही चांगली कमाई करू शकता.

Advertisement

तालिबानची आर्थिक कोंडी..! जागतिक संघटनांनी घेतला महत्वाचा निर्णय, देश चालविणे होणार मुश्किल..
पारनेर तहसीलदारांना ‘त्यांचा’ आधार; आमदार लंकेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष, पीडीएफही होतेय व्हायरल..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply