Take a fresh look at your lifestyle.

घरात पडून असलेल्या सोन्यावरही मिळणार दणकून पैसा, रिझर्व्ह बॅंकेची ही योजना पाहिली का..?

नवी दिल्ली : भारतीयांना नेहमीच सोन्याचे आकर्षण राहिलेले आहे. सर्वाधिक परतावा मिळत असल्याने अनेक जण आता सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहत आहेत. अडचणीच्या काळात सोनेच मदतीला येते. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासूनच सोन्याला मोठे मोल प्राप्त झाले आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती गेल्या काही काळात गगणाला भिडल्याचे पाहायला मिळत आहे.

Advertisement

घरात सोने ठेवणे धोकेदायक असल्याने अनेक जण त्यासाठी बँकेतील लॉकर घेतात. त्यासाठी शुल्क भरतात, पण असे घरात ठेवलेल्या सोन्यातूनही पैसे कमावता येतात. त्यासाठी एकच करावे लागेल, ते म्हणजे तुमचे निष्क्रिय सोने रिझर्व्ह बॅंकेने (RBI) नियुक्त केलेल्या बँकेत जमा करावे लागेल. त्यावर तुम्ही भरगच्च व्याज मिळवू शकता.

Advertisement

‘आरबीआय’ने सुवर्ण मुद्रीकरण योजना (Gold Monetisation Scheme) सुरु केली आहे. त्यात तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. बँकेच्या मुदत ठेवीसारखीच ही योजना आहे. त्यात तुम्ही घरी पडून असलेले सोने बँकेत जमा करता येते. मॅच्युरिटी झाल्यावर तुम्हाला सोने वा सोन्याचे मूल्य जमाव्याजासह परत मिळते.

Advertisement

एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) यांसह अनेक बँका ट्विटरवर ‘आरबीआय’च्या सुवर्ण मुद्रीकरण योजनेचा प्रचार करताना दिसत आहेत.

Advertisement

“तुमच्याकडील निष्क्रिय सोन्यावर व्याज मिळवू शकता. एचडीएफसी बँक तुमच्या निष्क्रिय सोन्यावर जास्त व्याज देते. एचडीएफसी बँक गोल्ड मुद्रीकरण योजनेमध्ये गुंतवणूक करा, दीर्घ मुदतीच्या ठेवींवर 2.50% आणि मध्यम मुदत ठेवींवर 2.25% व्याज मिळवा. या योजनेअंतर्गत सोन्याची किंमत मॅच्युरिटीच्या वेळी सध्याच्या किमतीवर आधारित असेल. सोन्याच्या ठेव मूल्यावर व्याज मोजले जाणार आहे.” असे ट्विट एचडीएफसी बँकेने केले आहे.

Advertisement

फिक्स डिपॉझिटच्या स्वरूपात सोन्यातूनही व्याज मिळू शकते. भारताची रहिवासी असणारी कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. गोल्ड एफडी संयुक्त नावानेही उघडता येते. बँका या योजनेंतर्गत सोन्याचे बार, नाणी, रत्ने आणि इतर धातू वगळता दागिन्यांच्या स्वरूपात कच्चे सोने स्वीकारतात.

Advertisement

गुंतवणूकदार किमान 10 ग्रॅम कच्चे सोने जमा करू शकतो. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. गुंतवणूकदार 1 ते 15 वर्षांच्या दरम्यान कोणतीही मुदत निवडू शकतात. मुदतीचे विविध पर्याय खाली दिले आहेत..

Advertisement
  • शॉर्ट टर्म बँक डिपॉझिट (STBD): कार्यकाळ 1 ते 3 वर्षे
  • मध्यम मुदतीची सरकारी ठेव (MTGD): कार्यकाल: 5-7 वर्षे
  • दीर्घकालीन सरकारी ठेवी (LTGD) कालावधी 12-15 वर्षे

मॅच्युरिटीच्या वेळी ठेवीदाराला ज्या स्वरूपात त्याने सोने जमा केले होते त्याच स्वरूपात ते मिळत नाही. जमा केलेले सोन्याचे दागिने वितळले जातात आणि पीव्हीसीद्वारे चाचणी केली जाते.

Advertisement

टोमॅटो 25 पैसे किलो, तर कारले 2 रुपये..! बळीराजाचा वाहतूक खर्चही निघेना, पाहा कुठे मिळाला हा विक्रमी भाव..?
खाद्यतेल स्वस्त होणार, शेतकऱ्यांचाही होणार मोठा फायदा, मोदी सरकारचा मोठा निर्णय..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply