Take a fresh look at your lifestyle.

पारनेरप्रकरणी चित्रा वाघ आक्रमक; पवारांच्या भूमिकेला केले लक्ष्य, पहा NCP आमदार लंकेंचे नाव न घेता म्हटलेय ‘असे’

अहमदनगर : पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिल्याने अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकार आणि स्थानिक आमदार निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्ला करताना याप्रकरणी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही लक्ष्य केले आहे. महिला सबलीकरण आणि पवार साहेबांनी केलेले काय याचे दाखले वेळोवेळी दिले जातात. त्यामुळे आता वाघ यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Advertisement

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप ऐकली आणि मन सुन्न झाले, असे चित्रा वाघ यांनी म्हटल आहे. ‘सत्तेतले हे बेलगाम घोडे… देवमाणूस म्हणून मिरवणार्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱ्याकडून होतयं का तेचं आता पहायचयं’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटलेय की, लसीकरण केंद्रात एका आरोग्य कर्मचाऱ्याला लोकप्रतिनिधीकडून मारहाण होते. कारण फक्त एकच की तिथं दुकानदारांचं लसीकरण केलं. तिथे रात्रीच लोकप्रतिनिधी जातात. महिला आरोग्य कर्मचाऱ्याला खोदून-खोदून विचारतात. तिल्या लिपिकाला मारतात. थोड्यावेळाने लिपिकाचा व्हिडीओ येतो की मला काही लोकप्रतिनिधींनी मारल नाही.

Advertisement

महिला अधिकाऱ्यांना किंवा महिलांना कुणी वालीच राहिला नाही. त्यामुळे प्रत्येकीने सुसाईड नोट ही ड्रॉवरमध्ये ठेवा, असंही सांगायला त्या विसरलेल्या नाहीत. हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात होत आहे. माँसाहेब जिजाऊंच्या महाराष्ट्रात होत आहे आणि आम्ही सावित्रीच्या लेकी, आमच्यासोबत हे सगळं होतंय. सत्तेच्या या बेलगाम घोड्यांना वेळीच वेसण घालणं गरजेचं आहे. देवमाणूस म्हणून वापरणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणाच्या बाता मारणारे कशी वेसण घालतात हेच आता पाहायचे आहे. नाहीतरी या महाराष्ट्रात बाई मेल्याशिवाय, तिने आत्महत्या केल्याशिवाय, तिने जीव दिल्याशिवाय तिच्या म्हणण्याला कुठे किंमत आहे? असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply