Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून पारनेरचा बिहार झाला; झावरे यांनी केली जोरदार टीका..!

अहमदनगर : पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांच्या एका व्हायरल ऑडीओमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. कारण, या ऑडीओमध्ये देवरे यांनी लोकप्रतिनिधी कसा दबाव आणतात आणि त्यामुळे आत्महत्या करावीशी वाटते याबाबत स्पष्ट म्हटलेले आहे. हाच धागा पकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी राष्ट्रवादीचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

Advertisement

पारनेरचा बिहार झालाय – सुजित झावरे – Parner has become Bihar – Sujit Zaware | Politics Marathi News – Sarkarnama

Advertisement

सरकारनामा या न्यूज पोर्टलने यावर एक बातमी केली आहे. त्यात म्हटले आहे की, क्लिपमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. झावरे यांनी आरोप करताना म्हटलेले आहे की, तालुक्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसह सामान्य जनतेचे जगणे मुश्कील झालेले आहे. तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा गंभीर झाला आहे. तालुक्याचा बिहार झाला असून त्यात स्पष्टपणे लोकप्रतिनिधी असे म्हटले आहे म्हटल्यावर कोणाचा त्रास आहे हे स्पष्ट आहे.

Advertisement

Advertisement

लोकप्रतिनिधींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी म्हटलेले आहे. तहसीलदार देवरे यांनी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याही कानावर हे प्रकरण घातल्याचे सरकारनामा यांनी बातमीत म्हटलेले आहे. एकूणच आता याप्रकरणी पुढे कोणावर काय कार्यवाही होणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

सरकारनामा बातमी लिंक : http://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya-nagar/parner-has-become-bihar-sujit-zaware-81939

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply