Take a fresh look at your lifestyle.

आणि झावरेंच्या वक्तव्याची झाली आठवण.! ‘पारनेर’प्रकरणी चर्चेला उधाण, आमदार लंकेंकडे बोट..?

अहमदनगर : आता महसूलमंत्री आणि कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यात एका जबाबदार महिला अधिकाऱ्यांना थेट सुसाईडची धमकी देण्याचे टोक गाठावे लागत असल्याने खळबळ उडाली आहे. कारण, याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्याकडे बोट करण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच यानिमित्ताने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्याही वक्तव्याची अनेकांना आठवण होत आहे.

Advertisement

Advertisement

आमदारकीच्या निवडणुकीत तत्कालीन शिवसेना आमदार विजय औटी यांचा प्रचार करताना झावरे यांनी मतदारांना पारनेरचा बिहार न करण्याचे आवाहन केले होते. निवडणुकीत लंके यांना मतदान म्हणजे बिहार राज्यासारखी कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजवणे असाच रोख त्यावेळी झावरे यांचा होता. आता तहसीलदार ज्योती देवरे यांच्या व्हायरल ऑडीओमुळे अनेकांना आता झावरे यांच्या त्या वक्तव्याची आठवण होत आहे.

Advertisement

झावरे यांनी आता असे म्हटल्याची बातमी व्हायरल झाल्यावर ‘कृषीरंग’ने संपर्क केला. त्यावर सुजित झावरे यांनी म्हटले आहे की, माझी सध्या काहीही भूमिका नाही. त्यावेळी प्रचार करतानाच मी मतदारांना या संकटाचे सूचक वक्तव्य केले होते. आताचे ऑडीओ आणि सध्याच्या बातम्या यावर आमचे काहीही म्हणणे नाही. दरम्यान, आता याप्रकरणी व्हायरल होत असलेल्या ऑडीओ क्लिपमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. एकूणच आता याप्रकरणी पुढे काय होणार की परंपरेनुसार यावरही पडदा टाकला जाणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांच्या एका व्हायरल ऑडीओमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. कारण, या ऑडीओमध्ये देवरे यांनी लोकप्रतिनिधी कसा दबाव आणतात आणि त्यामुळे आत्महत्या करावीशी वाटते याबाबत स्पष्ट म्हटलेले आहे. क्लिपमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. लोकप्रतिनिधींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी म्हटलेले आहे. तहसीलदार देवरे यांनी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याही कानावर हे प्रकरण घातल्याचे सरकारनामा यांनी बातमीत म्हटलेले आहे. एकूणच आता याप्रकरणी पुढे कोणावर काय कार्यवाही होणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply