Take a fresh look at your lifestyle.

महसूलमंत्री थोरातांच्या जिल्ह्यात अधिकारी दबावात; पारनेरच्या तहसीलदारांनी दिली सुसाईडची धमकी..!

अहमदनगर : महाराष्ट्रात महसूल विभागात चालू असलेल्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा जगजाहीर आहेत. मात्र, त्यावर वचक बसवून सामान्य नागरिकांना न्याय देण्यात हा विभाग कमी पडत आहे. अशावेळी आता महसूलमंत्री आणि कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यात एका जबाबदार महिला अधिकाऱ्यांना थेट सुसाईडची धमकी देण्याचे टोक गाठावे लागत असल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

महसूलमंत्री थोरात यांच्या जिल्ह्यात वाळूतस्करी आणि जमिनीच्या खरेदी-विक्रीमधील घोटाळे अनेकदा चव्हाट्यावर आलेले आहेत. मात्र, तरीही पढे काहीच कार्यवाही झालेली नाही. अशावेळी आता अहमदनगर जिल्ह्यात थेट एका तहसीलदार महिला अधिकाऱ्यांना त्रास देऊन आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याची बातमी येत आहे. याप्रकरणी व्हायरल होत असलेल्या ऑडीओ क्लिपमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. एकूणच आता याप्रकरणी पुढे काय होणार की परंपरेनुसार यावरही पडदा टाकला जाणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Advertisement

पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांच्या एका व्हायरल ऑडीओमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. कारण, या ऑडीओमध्ये देवरे यांनी लोकप्रतिनिधी कसा दबाव आणतात आणि त्यामुळे आत्महत्या करावीशी वाटते याबाबत स्पष्ट म्हटलेले आहे. क्लिपमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. लोकप्रतिनिधींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी म्हटलेले आहे. तहसीलदार देवरे यांनी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याही कानावर हे प्रकरण घातल्याचे सरकारनामा यांनी बातमीत म्हटलेले आहे. एकूणच आता याप्रकरणी पुढे कोणावर काय कार्यवाही होणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply