Take a fresh look at your lifestyle.

तहसीलदार देवरेंच्या पाठीशी मनसे भक्कम; पहा नेमका काय दावा केलाय कार्यकर्त्यांनी

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा दिलेली ऑडिओ क्लिप आज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये पारनेरचे लोकप्रतिनिधी कशा प्रकारे अधिकाऱ्यांना त्रास देतात याची माहिती देवरे यांनी दिलीय. दरम्यान, याप्रकरणी महाराष्ट्र भाजपनंतर आता स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनीही यात उडी घेत देवरे यांना पाठींबा असल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे.

Advertisement

मनसेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, देवरे यांनी सर्वाना हेलावून सोडले आहे. देवरे यांनी अशा प्रकारे लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करू नये. मनसे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असा प्रस्ताव देत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ, जिल्हासचिव नितीन भूतारे, पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहकले आदी उपस्थित होते.

Advertisement

मनसे पदाधिकारी शिष्ठ मंडळाने भेट घेऊन निवेदन देऊन या ऑडिओ क्लिपची चौकशी करा आणि दोषी लोकप्रतिनिधींवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे. त्यांनी पुढे म्हटलेय की, लोकप्रतिनिधींचा त्रास सहन होत नाही त्यामुळे आत्महत्या करण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. त्यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यात एक महिला तहसीलदार अधिकारी सुरक्षित नसेल तर पारनेरचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही व लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाने तालुक्यातील खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रकार झालेले आहेत. एक महिला अधिकारी तहसीलदार अशाप्रकारे आत्महत्येचा इशारा देत असेल तर यापेक्षा गांभीर्य परिस्थिती अजून तालुक्यात काय असू शकते? त्यामुळे ज्योती देवरे यांचा जबाब नोंदवून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. जेणेकरून पारनेर तालुक्यात भयमुक्त वातावरण होईल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply