Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून भारत-पाकिस्तान येणार आमनेसामने; पहा कुठे रंगणार चुरशीचा सामना

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या वर्षी खेळल्या जाणाऱ्या टी -20 विश्वचषकाचे वेळापत्रक (टाईमटेबल) प्रसिद्ध केले आहे. टी -20 चॅम्पियन स्पर्धेत भारतीय संघ 24 ऑक्टोबरपासून विश्वचषकात आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. संघाचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. दुसरीकडे स्पर्धेचा पहिला सामना 17 ऑक्टोबर रोजी ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे. तर, अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Advertisement

आयसीसीने काही काळापूर्वीच टी -20 विश्वचषकासाठी गट जाहीर केला होता. ओमानमध्ये खेळल्या जाणाऱ्या फेरीत 8 संघ सुपर -12 मध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळतील. या संघांमध्ये 2014 टी 20 विजेता श्रीलंका, आयर्लंड आणि बांगलादेश सारख्या मोठ्या संघांची नावे आहेत. विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. पात्रता फेरीसह एकूण 45 सामने खेळले जातील. यापैकी 12 सामने क्वालिफायर फेरीत आणि 30 सामने सुपर -12 फेरीत खेळले जातील. याशिवाय उपांत्य फेरी आणि अंतिम सामने होतील.

Advertisement

भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा सामना 2016 मध्ये खेळला गेला होता. हा देखील टी -20 विश्वचषक सामना होता. टी -20 विश्वचषकात दोन्ही संघ 5 वेळा आमनेसामने आले आहेत. या सगळ्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. एकूण टी -20 बद्दल बोलायचे झाले तर भारत आणि पाकिस्तान 8 सामने खेळले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 7 आणि पाकिस्तानने 1 सामना जिंकला आहे. 1 सामना भारताने बॉल आउटमध्ये टायनंतर जिंकला होता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply