Take a fresh look at your lifestyle.

पडळकर समर्थकांनी बैलगाडा शर्यत घेतलीच, पोलिस प्रशासनाला गुंगारा, पडळकर काय म्हणतात पाहा..?

सांगली : बंदी असतानाही पोलिस प्रशासनाला गुंगारा देत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व त्यांच्या समर्थकांनी सांगली जिल्ह्यातील झरे गावात आज (ता.20) पहाटे बैलगाडा शर्यत पार पाडली. कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत होऊ देणार नसल्याचा इशारा शासनाने दिला होता. मात्र, शर्यत होणारच असल्याचा निर्धार पडळकर यांनी बोलून दाखविला होता. त्यानुसार आज सकाळी पडळकर समर्थकांनी बैलगाडा शर्यती घेतलीच.

Advertisement

पोलिस प्रशासनाने पडळकर यांच्या बैलगाडा शर्यतीला परवानगी नाकारली होती. मात्र, त्यानंतरही पडळकर आपल्या निर्णयावर ठाम असल्याने, गेल्या दोन-तीन दिवसांपासून झरे गावासह परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे बैलगाडा शर्यत होणार नसल्याचेच वातावरण झाले होते.

Advertisement

पडळकर यांच्या फार्म हाऊसच्या बाजूला बैलगाडा शर्यतीसाठी ट्रॅक उभारला होता. याबाबत सुगावा लागताच, पोलिसांनी तो ट्रॅक उद्धवस्त केला. पोलिसांच्या आक्रमक पावित्र्यानंतर पडळकर समर्थकांनी तेथूनच पाच किलोमीटरावर रात्रीतून दुसरा ट्रॅक केला आणि भल्या सकाळीच ही स्पर्धा पार पडली. शर्यतीत पाच ते सहा बैलगाडा चालक आणि मालक सहभागी झाले होते.

Advertisement

बैलगाडा शर्यतीवरुन राज्यात मोठे राजकारण रंगले आहे. राज्यात बंदी असली, तरी बैलगाडा शर्यत घेणारच, अशी भूमिका पडळकर यांनी घेतली होती. पोलिस प्रशासनाने मात्र बैलगाडा शर्यत होऊ देणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे या शर्यतीकडे राज्याचे लक्ष लागले होते. अखेर शर्यत झाली नि पडळकर समर्थकांनी एकच जल्लोष केला.

Advertisement

याबाबत माध्यमांशी बोलताना पडळकर म्हणाले, की “काही शेतकरी, बैलगाडा चालक-मालकांनी बैलगाडा शर्यत घेतल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून मिळाली. आम्ही त्या ठिकाणी गेलेलो नाही. झरे गावात मोठा पोलिस बंदोबस्त होते. कायदा-सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिस प्रशासनाने आम्हाला विनंती केली. त्यांच्या विनंतीला आम्ही मान दिला; पण आता काही शेतकऱ्यांनी स्पर्धा घेतल्याचे कळतेय..”

Advertisement

समर्थकांनी ही शर्यत घेतली का, या प्रश्नावर ते म्हणाले, की “बैलगाड्याला कोणताही जात, पात, धर्म, प्रांत काहीही नाही. गोवंश वाचविला पाहिजे, त्याचे जतन केलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आपण गोवंश जतन केला नाही, तर येणाऱ्या पिढीला आपल्याला चित्रात बैल दाखविण्याची वेळ येईल..”

Advertisement

कोणी रेल्वे घेता रेल्वे..! मोदी सरकारला मिळेना रेल्वेसाठी गुंतवणूदार.. कशामुळे आलीय ही वेळ पाहा..?
आता सणसूद दणक्यात होणार, पैशाची चिंताच नाही..! मोदी सरकारचा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply