Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ निर्णयाने ३३ हजार ८९५ शेतकऱ्यांना दिलासा; पहा नेमका काय निर्णय घेतलाय सरकारने

मुंबई : अवसायनात निघालेल्या भूविकास बँकेची सरसकट थकीत शेती कर्जे माफ करण्यासंबंधी अनेकदा मागणी होऊनही काहीही निर्णय होत नव्हता. त्यामुळे २०१६ पासून अनेक शेतकऱ्यांचा व संबंधित बँक अधिकारी व कर्मचारी यांचा जीव टांगणीला लागला होता. आता त्या सर्वांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Advertisement

१९३५ मध्ये स्थापन झालेली भूविकास बँक २०१६ मध्ये अवसायनात निघाली होती. तेव्हापासून कर्ज आणि कामगार देणी दोन्ही थकलेली आहेत. याचा लाभ ३३ हजार ८९५ शेतकऱ्यांना आणि ३ हजार २९६ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीस सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ तसेच बच्चू कडू, विश्वजित कदम आदि उपस्थित होते.

Advertisement

Advertisement

अजित पवार यांनी सहकार विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. भरपाईच्या माेबदल्यात सरकार बँकेच्या सर्व मालमत्ता ताब्यात घेणार असून मालमत्ता ताब्यात घेऊन देणी देता येणार नाहीत का, अशी राज्य बँकेला विचारणा करण्यात आली होती. या बँकेची शेतकऱ्यांकडे ३४८ कोटीची कर्जे थकीत आहेत, तर कर्मचाऱ्यांची २८३ कोटींची देणी बाकी आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply