Take a fresh look at your lifestyle.

सोप्पंय की.. कार घ्यायला मिळेल मग मोठीच सूट; फ़क़्त गरज आहे ‘त्या’ सर्टिफिकेटची..!

मुंबई : पुढील फेस्टीव्हल सिजनमध्ये आपली जुनी कार बदलण्याचा किंवा नवी अलिशान कार घेण्याचा विचार करीत असल्यास ही महत्वाची बातमी नक्कीच वाचा. कारण, ही बातमी वाचून आपण कार घेताना बरेच पैसे वाचवू शकता. पेट्रोल-डीझेलच्या दरवाढीत किमान हा किरकोळ का होईना दिलासा मग तुम्हाला अच्छे दिनचा फील देईल की.

Advertisement

केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलेय की, नव्या धोरणांतर्गत जुने वाहन स्क्रॅप करून नवे वाहन घेताना सवलत मिळणार आहे. याच वर्षी २५ सप्टेंबरपासून सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट दाखवून नवे वाहन घेताना मोटार वाहन करात सूट मिळेल. तसेच सर्वात आधी शासकीय वाहनांसाठी धोरण लागू करताना पुढील वर्षी १ एप्रिलपासून १५ वर्षे जुनी सर्व शासकीय वाहने स्क्रॅप करावी लागतील. १ एप्रिल २०२३ पासून अवजड वाहने, तर १ जून २०२४ पासून सर्व वाहनांसाठी फिटनेस चाचणी सक्तीची असणार आहे.

Advertisement

स्क्रॅप प्रमाणपत्र दाखवल्यास नवे वाहन घेताना २५ सप्टेंबरपासून नोंदणी शुल्क लागणार नाही. तसेच रस्ता करावर तब्बल २५ टक्के सूट देण्याच्या नियमातही बदल केले जातील. वाहन उत्पादकांनाही नव्या वाहनांवर ५ टक्क्यांपर्यंत सूट देण्याचे सांगण्यात येणार असून पुढील दहा ते पंधरा दिवसांत नव्या नियमांच्या पाच अधिसूचना काढल्या जातील, असे केंद्रीय परिवहन मंत्रालयाने  म्हटलेले आहे. याद्वारे खासगी वाहनांना रस्ता करात २५ टक्क्यांपर्यंत व व्यावसायिकांना १५ टक्के सूट मिळेल.

Advertisement

झालेले बदल : व्यावसायिक वाहन नोंदणी फिटनेस प्रमाणपत्राच्या वैधतेशी जोडली जाऊन पहिली नोंदणी आठ वर्षे असून मग नवव्या वर्षापासून दरवर्षी फिटनेस तपासणी केली जाईल. दर दोन वर्षांनी फिटनेस चाचणी करून मग पुढील नोंदणी केली जाईल. तसेच खासगी वाहनाची पहिली नोंदणी केल्यानंतर १५ वर्षांपर्यंत वैध राहील. त्यानंतर दर पाच वर्षांनी तपासणी आणि मग नोंदणी केली जाईल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply