Take a fresh look at your lifestyle.

आता सणसूद दणक्यात होणार, पैशाची चिंताच नाही..! मोदी सरकारचा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय..!

नवी दिल्ली : श्रावण सुरु झाला, नागरिकांना विशेषत: महिला वर्गाला वेध लागतात, ते सणासुदीचे..! आता सण-उत्सव साजरा करायचा म्हणजे पैशांचा चुराडा आलाच की.. त्यात गेल्या दोन वर्षात कोरोनाने अनेकांचा खिसा खाली झालाय.. अशात प्रत्येक जण हात राखून सण साजरे करतोय.. आता कोरोनाची परिस्थिती निवळली असली, बाजार सुरु झाला असला, तरी अजूनही बाजारात तितका उत्साह दिसत नाही.

Advertisement

पण, तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल, तर पैशांची काळजी करु नका. मोदी सरकार सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांनी गिफ्ट देणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आगाऊ पगार आणि पेन्शन देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या केरळ आणि महाराष्ट्रातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना अॅडव्हान्स सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर उर्वरित राज्यांनाही लवकरच खूशखबर मिळू शकते.

Advertisement

सणासुदीच्या काळात बाजारात खरेदीला उधाण आलेले असते. त्यामुळे आगाऊ पगार आणि पेन्शन देऊन अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सुरुवातीला मोदी सरकारने फक्त केरळ आणि महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनाच आगाऊ वेतन देण्याबाबतचे आदेश दिले आहेत. कारण, केरळमध्ये ओणम, तर महाराष्ट्रात गणपती उत्सवासारखे मोठे उत्सव ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात साजरे होणार आहेत.

Advertisement

ग्राहकांच्या हातात अधिक पैसे असतील, तर विशेष खरेदी केली जाते. त्यामुळे येत्या काळात इतर राज्यांसाठीही असेच आदेश जारी केले जाऊ शकतात.

Advertisement

केरळमध्ये 19 ऑगस्ट, तर महाराष्ट्रात 18 सप्टेंबरलाच कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात मनमोकळा खर्च करता येणार आहे. तसेच पेन्शनर्स लोकांनाही आगाऊ पेमेंट केलं जाईल. तसे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयाचा फायदा डिफेन्स, पोस्ट, टेलिकॉम कर्मचाऱ्यांना होईल. अर्थ मंत्रालयाने यावर त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर लवकरत बंगाल, यूपी, बिहारसाठी देखील निर्देश जारी केले जाऊ शकतात.

Advertisement

खाद्यतेल स्वस्त होणार, शेतकऱ्यांचाही होणार मोठा फायदा, मोदी सरकारचा मोठा निर्णय..!
बॅंक लाॅकरच्या नियमांत मोठे बदल, आरबीआयकडून बॅंकांना निर्देश, ग्राहकांवर काय परिणाम होणार..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply