Take a fresh look at your lifestyle.

खाद्यतेल स्वस्त होणार, शेतकऱ्यांचाही होणार मोठा फायदा, मोदी सरकारचा मोठा निर्णय..!

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खाद्यतेल स्वस्त होईलच, शिवाय शेतकऱ्यांचाही मोठा फायदा होणार आहे.

Advertisement

मोदी सरकारने बुधवारी (ता. 18) पाम ऑईल मिशन योजनेला मंजुरी दिली. देशातील खाद्यतेलाचे उत्पादन वाढविण्यासाठी मोदी सरकारने 11,040 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली. नॅशनल मिशन ऑन आईल सिड्स आणि ऑईल पामच्या माध्यमातून सरकार 11 हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करणार असल्याचे त्यात म्हटले आहे.

Advertisement

सध्या आयात केलेल्या तेलावरच भारताला अवलंबून राहावं लागतं. हे अवलंबित्व कमी करून खाद्यतेलाच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी मोदी सरकारने ही योजना आखली आहे. त्याला ‘राष्ट्रीय खाद्यतेल मिशन–ऑईल पाम’ असे नाव देण्यात आले आहे. त्यातून अनेकांच्या हाताला कामही मिळणार आहे. ही योजना भारताला खाद्यतेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवेल, असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी व्यक्त केला.

Advertisement

कृषीमंत्री तोमर यांनी सांगितले, की या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासह मदत होणार आहे. खाद्यतेलाशी संबंधित उद्योगांच्या उभारणीसाठी सरकारकडून 5 कोटी रुपयांच्या मदतीचीही घोषणा करण्यात आली आहे.

Advertisement

शेतकऱ्यांचाही होणार फायदा

Advertisement

पाम ऑईल हे एक प्रकारचे खाद्यतेल असून, ताडाच्या बियांपासून हे तेल काढण्यात येतं. पाम तेलासाठीच्या कच्च्या मालाची किंमत सरकार निश्चित करणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तेलबियांची लागवड करावी, यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्याचा भाव कोसळल्यास शेतकऱ्यांना तितक्या फरकाची सबसिडी दिली जाणार असल्याचे कृषिमंत्री तोमर यांनी सांगितले.

Advertisement

बॅंक लाॅकरच्या नियमांत मोठे बदल, आरबीआयकडून बॅंकांना निर्देश, ग्राहकांवर काय परिणाम होणार..?
गुगल प्ले स्टोअरवर आलेय ‘शासन शब्दकोश भाग-1’; पहा काय होणार फायदा

Advertisement
Advertisement

Leave a Reply