Take a fresh look at your lifestyle.

बॅंक लाॅकरच्या नियमांत मोठे बदल, आरबीआयकडून बॅंकांना निर्देश, ग्राहकांवर काय परिणाम होणार..?

नवी दिल्ली : नागरिकांच्या सोयीसाठी बँकांमध्ये लॉकरची सुविधा केलेली असते. त्यात ग्राहकांना घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवता येतात. त्यासाठी बॅंक ग्राहकांना ठराविक रक्कम आकारते.

Advertisement

तुम्हीही असेच बॅंक लाॅकर वापरत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण बँक लॉकरच्या नियमांत काही बदल करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिशानिर्देश जारी केले आहेत. हे नवे नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहेत.

Advertisement

बॅंक लाॅकरबाबत नवे नियम

Advertisement

लॉकर वाटपात पारदर्शकता आणा
बँकांनी लॉकर वाटपात पारदर्शकता आणण्याचे निर्देश ‘आरबीआय’ने दिले आहेत. शाखानिहाय लॉकर वाटपाची माहिती, प्रतिक्षायादी कोअर बँकिंग प्रणालीशी जोडली जाणार आहे. लॉकर वाटपाच्या सर्व अर्जांसाठी बँकांना पावती द्यावी लागेल. लॉकर वाटपासाठी उपलब्ध नसल्यास बँकांना ग्राहकांना प्रतीक्षा यादी क्रमांक द्यावा लागेल.

Advertisement

सुरक्षित डिपॉझिट लॉकर
बँकेचे सध्याचे ग्राहक ज्यांनी लॉकर सुविधेसाठी अर्ज केला आहे, जे सीडीडी (Customer Due Diligence) मानकांचे पालन करीत आहेत, त्यांना सुरक्षित डिपॉझिट लॉकर/सेफ कस्टडी आर्टिकलची सुविधा नियमानुसार दिली जाऊ शकते. ही सुविधा अशा ग्राहकांनाच दिली जाईल, ज्यांचे बँकेशी इतर कोणतेही बँकिंग संबंध नाहीत.

Advertisement

धोकादायक पदार्थ ठेवता येणार नाही
बँक लॉकरमध्ये काही वेळा ग्राहक चुकीच्या गोष्टी ठेवतात. ते टाळण्यासाठी ‘आरबीआय’ने लॉकरसंदर्भातील करारात महत्त्वाचे कलम समाविष्ट केले आहे. ग्राहकांना लॉकरमध्ये काहीही बेकायदेशीर किंवा कोणताही धोकादायक पदार्थ ठेवता येणार नाही. बँकेला कोणत्याही ग्राहकाद्वारे सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये कोणत्याही बेकायदेशीर किंवा धोकादायक पदार्थाच्या ठेवीचा संशय आला, तर अशा ग्राहकांवर कारवाई करण्याचा अधिकार बँकेला असेल.

Advertisement

भाडे न भरल्यास बॅंक लाॅकर उघडणार
आग, चोरी, इमारत कोसळणे वा बँक कर्मचाऱ्यांकडून फसवणूक झाल्यास बँकांचे दायित्व त्याच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट मर्यादित असेल. ग्राहकाने सलग तीन वर्षे भाडे भरले नाही, तर बँक योग्य प्रक्रियेनंतर कोणताही लॉकर उघडू शकते, असेही नव्या नियमात नमूद केले आहे.

Advertisement

अर्र.. अदाणींना बसलाय मोठाच झटका; पहा कशाचा झालाय विपरीत परिणाम
कांदा मार्केट स्थिर; पहा पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूरसह राज्यभरातील बाजार परिस्थिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply