Take a fresh look at your lifestyle.

म्हणून बदामाच्या महागाईचा भडका उडणार; पहा काय संबंध आहे ग्लोबल वार्मिंगचा..!

मुंबई : अफगाणिस्तान या देशात तालिबानी माथेफिरू गटाने सत्ता हस्तगत केल्याच्या बातम्यांसह सुकामेवा बाजारपेठेत महागाईचा आगडोंब उसळणार असल्याच्या बातम्या येत आहेत. काही माध्यमांनी दोन्हींचे संबंध लावले आहेत. मात्र, बदामाचे भाव वाढण्याच्या शक्यतेला या दहशतवादी संकटाची नाही, तर मानवाने पर्यावरण क्षेत्रात घातलेल्या घोळाची किनार आहे.

Advertisement

Advertisement

होय, अमेरिकेच्या पश्चिमेकडील भागात ऐतिहासिक दुष्काळामुळे जगाला बदाम खाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. जगातील ८०% बदामाचे उत्पादन करणाऱ्या कॅलिफोर्नियातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसलेला आहे. परिणामी आता हजारो हेक्टरवरील बदामाचे पीक वाळत असल्याने जगाला बदामाच्या दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे.

Advertisement

ग्लोबल वार्मिंगमुळे अतिपाउस आणि कडाक्याचा दुष्काळ असे विचित्र हवामान जगाला सोसावे लागत आहे. परिणामी याचा मोठा फटका अवघ्या मानवी समाजाला बसत आहे. असाच दुष्काळ अमेरिकेत पडल्याने आता बदाम महागणार आहे. भारतात बदामाचे उत्पादन नाममात्र असून २०२०-२१ मध्ये भारतात १.१५ लाख टन बदामाची आयात करावी लागली होती. अमेरिकी कृषि विभागानुसार (यूएसडीए) कॅलिफोर्नियात २०२० मध्ये १४ लाख टन बदामाचे उत्पादन झालेले असताना यंदा मात्र १२.७ लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply