Take a fresh look at your lifestyle.

म्हणून चीनने अमेरिकेला म्हटलेय ‘पळपुटा’..! पहा कोणत्या शेलक्या भाषेत केलीय ग्लोबल टाईम्सने टीका

दिल्ली : अफगाणिस्तानला तालिबान्यांच्या संकटात ढकलण्यास अमेरिकाच जबाबदार असल्याचे आरोप होत आहेत. कारण अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने संपूर्ण देशावर कब्जा केला आहे. तिथे तालिबानी राजवट सुरू झाली असून अब्जावधी रुपयांचा चुराडा केल्यानंतरही अमेरिकेस तालिबानचा पराभव करता आला नाही हे वास्तव जगजाहीर झालेले आहे. आता अफगाणी नागरिकांना संकटात टाकून अमेरिकेने येथून काढता पाय घेतल्याने जगभरातून टीका होत आहे. चीनसह काही देश तर याप्रकरणी अमेरिकेची खिल्ली उडवत आहेत.

Advertisement

चीनने या संधीचा फायदा घेत जोरदार निशाणा साधला आहे. चीनी सरकारीचे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये यावर विशेष लेख प्रसिद्ध होत आहेत. अफगाणिस्तानच्या घडामोडींवर एका लेखात अमेरिकी धोरणावर जोरदार टीका करताना अमेरिका मदत करण्याऐवजी परिस्थिती बिघडली की पळून जाते, अशी गंभीर टीका केली आहे. पुढे म्हटलेय की, अमेरिका हा देश बेभरवशी आणि विश्वासघातकी असल्याचे म्हणताना 20 वर्षे अब्जो डॉलर्स खर्च केल्यानंतरही तालिबानचा पराभव करता न आलेला हा देश तैवानमध्ये चीनला काय रोखणार?

Advertisement

अफगाणिस्तानमध्ये होणारा खर्च अमेरिकेस परवडत नसतानाच अफगाणिस्तानचे भू-राजनितिक मूल्य हे तैवानपेक्षा कमी नसतानाच तैवानमध्ये अमेरिकेचे कोणतेही सैन्य नसल्याकडे लक्ष वेधले आहे. चीनने तैवानवर कब्जा केल्यास अमेरिकेला अफगाणिस्तान, सिरिया आणि व्हिएतनामपेक्षाही जास्त ताकद लावावी लागेल आणि अशावेळी मग अमेरिकेस मोठी किंमत मोजण्याची तयारी ठेवावी लागेल, असा इशाराही या लेखातून देण्यात आला आहे. अफगाणिस्तान प्रकरणी जागतिक राजकारणातही वेगाने हालचाली होत आहेत. अमेरिकेवर जगभरातून प्रचंड टीका होत असताना राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जी परिस्थिती निर्माण झाली त्याचा दोष अफगाणिस्तानचे राष्ट्रपती आणि अफगाण सेनेवर टाकला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply