Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. जपान अडकतोय ‘त्या’ही संकटात; पहा नेमकी काय परिस्थिती ओढवलीय या देशावर

दिल्ली : करोना लसीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्यात भारत अनेक अर्थाने कमी पडत असल्याचे दिसत आहे. अशावेळी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगाची झोप उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, अनेक देश पुन्हा कोरोनाच्या संकटात ओढले जात असताना जपान आणि चीनमध्येसुद्धा डेल्टा व्हेरिएंटने थैमान घालण्यास सुरुवात केल्याच्या बातम्या आहेत.

Advertisement

जपानची राजधानी टोकियो शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून मागील दोन दिवसात 4 हजार 377 नवे रुग्ण आढळले आहेत. अनेक प्रांतात रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. यासह कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीनने कठोर निर्बंध लागू करताना काही शहरात कठोर लॉकडाऊन लावला आहे. इतकेच नाही तर चीनने याच्याही पुढे जाऊन कोरोना रोखण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या काही अधिकाऱ्यांवर कारवाईसुद्धा केली आहे.

Advertisement

जगभरात कोरोना अतिशय वेगाने फैलावत असून डेल्टा व्हेरिएंटमुळे जगातील बहुतांश देश पुन्हा कोरोनाच्या संकटात ढकलले जात आहेत. जपानमध्येही कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत चालला आहे. यासह ऑस्ट्रेलिया, ब्रिटेन, फ्रान्स यांसह अन्य काही देशात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. अमेरिकेतही सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने थैमान घातलेले आहे. रुग्ण वाढण्यामागे डेल्टा व्हेरिएंट व्यतिरिक्त लसीकरणाचा कमी झालेला वेग आणि मास्क वापराबाबत लोकांमध्ये संभ्रम हीसुद्धा कारणे आहेत.

Advertisement

कोरोना आपल्या देशातून गेला, देश कोरोना मुक्त झाला, असा दावा केलेले भारत आणि इस्त्राईल हे देश संकटात आहेत. हा विषाणू असा काही घातक आहे की रुपे बदलून पुन्हा आधिक वेगाने आक्रमण करत असल्याचे चित्र आहे. इस्त्रायलच्या या देशाने जवळपास सर्वच नागरिकांचे लसीकरण करून मास्कवरील निर्बंध हटवले होते. तर, भारताने करोना कमी झाल्याचे श्रेय घेण्याच्या नादात दुर्लक्ष करून निवडणुका घेतल्या होत्या. इस्त्रायल हा मास्कवरील निर्बंध हटवणारा पहिला देश असल्याचा दावा काहीच दिवसात फोल ठरला होता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply