Take a fresh look at your lifestyle.

बुलेटबाबतची ही महत्वाची बातमी वाचा की.. पहा नेमका कसा बसलाय कंपनीला झटका

मुंबई : बुलेट मोटारसायकल म्हणजे अनेकांच्या गळ्यातील ताईत. झीरोधा ब्रोकरेज फर्मचे संस्थापक निखिल कामत यांनी म्हटले होते की, जर भारतातील मिलेनियल स्वतःला एका कंपनीशी जोडू शकतात अशी एकच कंपनी आहे ती म्हणजे रॉयल एनफील्ड आहे. भारतातील लोकांमध्ये बुलेट्सची दीर्घकाळ क्रेझ आहे. त्याच कंपनीला मोठा झटका बसला आहे.

Advertisement

बुलेटच्या नावाने तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या पॉवर बाईक्स या रॉयल एनफील्ड नावाच्या कंपनीने बनवल्या आहेत. आता पुढील काळात शेअर बाजारात या कंपनीची चमक कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण, आयशर मोटर्सचे शेअर्स गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये जवळपास नऊ टक्क्यांनी कमी झाले आहेत. रॉयल एनफील्ड ही आयशर मोटर्सची उपकंपनी आहे. कंपनीने गेल्या काही वर्षांत उत्कृष्ट विक्री नोंदवली आहे. बुलेटची नवीन रचना, उत्पादन लाँच आणि लोकांची खर्च करण्याची क्षमता यामुळे बुलेटची विक्री सतत वाढत होती.

Advertisement

मात्र, लोकांच्या दृष्टीकोनात आता बदल झाला आहे. आयशर मोटर्सचे शेअर्स गेल्या तीन वर्षांपासून व्यापक श्रेणीत व्यवसाय करण्याच्या प्रयत्नात आहेत. तर, आयशर मोटर्सच्या कमकुवत वाढीमुळे गुंतवणूकदार आता चिंतेत दिसत आहेत. गेल्या तिमाहीच्या निकालांमध्ये कंपनीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. मात्र, दीर्घ कालावधीत कंपनीची कामगिरी खालावत आहे. आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये कमकुवतपणाचा अंदाज अनेक विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

अगोदर 19 विश्लेषकांनी आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये खरेदी सल्ला दिला होता. तर, आता 3 महिन्यांनंतर आयशर मोटर्स स्टॉकवर 13 विश्लेषकांनी विक्रीचा सल्ला दिला आहे. भारतातील 39 विश्लेषकांना आयशर मोटर्सचे शेअर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. अॅक्सिस कॅपिटलच्या शूर जालान यांनी म्हटले आहे की, या वर्षाचा पहिला तिमाही रॉयल एनफील्डसाठी खूप कठीण होता. त्यानुसार आता शेअर्स विकण्याची वेळ आली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply