Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. म्हणून अरबस्तानाच्या ‘त्या’ गुहेत सापडले हजारो मानवी हाडे; पहा नेमके काय आहे प्रकरण

दिल्ली : संशोधनातून अनेक महत्वाच्या गोष्टी उजेडात येत असतात. आताही सौदी अरेबियामध्ये अरबस्तानात आता एका गुहेत हजारो मानवी हाडे सापडली आहेत. त्यामुळे या बातमीकडे अवघ्या जगाचे लक्ष गेलेले आहे. येथील पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी 1.5 किलोमीटर लांबीच्या लाव्हा ट्यूबमध्ये अर्थात गुहेत पसरलेल्या हाडांचा एक मोठा संग्रह शोधला आहे. या गुहेला उम जिरसान म्हणतात. ही लावा ट्यूब ज्वालामुखीमधून बाहेर पडणाऱ्या लावाद्वारे बनलेली गुहा आहे.

Advertisement

या गुहेत हजारो हाडे सापडली असून त्यात अनेक मानवी अवशेषांचा समावेश आहे. संशोधक म्हणतात की ही हाडे 7,000 वर्षांपासून हायनांनी (तरस) गोळा केली आहेत. सौदी अरेबियातील गुहेत सापडलेल्या हाडांच्या विशाल संग्रहात गुरेढोरे, उंट, घोडे आणि मानवी कवटीचे अवशेष यासह अनेक प्राण्यांची हाडे सापडली आहेत. जेव्हा पुरातत्वशास्त्रज्ञांनी गुहेतून सापडलेल्या 1,917 हाडे आणि दात यांचे विश्लेषण केले आणि नमुन्यांची रेडिओकार्बन डेटिंग केली तेव्हा ते 439 ते 6,839 वर्षांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे संशोधन दर्शविते की मांसाहारी प्राणी बऱ्याच काळापासून लाव्हारसाच्या गुहांचा वापर करत आहेत.

Advertisement

या शास्त्रज्ञांनी हाडांवरील खुणांचा अभ्यास केला आणि त्यांना आढळले की, ही हाडे प्रामुख्याने धारीदार हायना आणि इतर प्राण्यांनी गोळा केल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हाडांमध्ये हायनाचे अवशेष देखील आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांचा असा दावा आहे की हा ‘हाडांचा संग्रह’ टाइम कॅप्सूलसारखा कार्य करेल आणि संशोधकांना प्राचीन अरेबियाचा इतिहास समजण्यास मदत करेल. संशोधक स्टीवर्ड यांच्या मते, हे संशोधन फक्त सुरुवात आहे. त्यांनी सांगितले की, उम्म जिरसान आणि अशी क्षेत्रे इतिहास जाणून घेण्यात महत्वाची भूमिका बजावतात. उम्म जिरसन हा हायनांनी गोळा केलेल्या हाडांचे एकमेव उदाहरण नाही. असाच आणखी एक हाडांचा संग्रह चेक प्रजासत्ताकमध्ये देखील आहे. हे Srbsko Chlum-Komin गुहेत आहे. जे 1942 मध्ये सापडले होते. मोठ्या स्तरातील 3500 पेक्षा जास्त हाडे येथे जतन केली गेली आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply