Take a fresh look at your lifestyle.

अपात्र शेतकऱ्यांकडून पीएम किसान याेजनेतील रकमेची वसुली सुरु, किती लाभार्थी आहेत पाहा..?

नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना (PM Kisan Scheme) सुरु केली. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांनी 2 हजार रुपये दिले जातात. या योजनेचा नववा हप्ता नुकताच जारी करण्यात आला. देशभरातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पोहोचली आहे.

Advertisement

दरम्यान, देशातील अनेक पात्र लाभार्थी शेतकरी या योजनेपासून वंचित असताना, दुसरीकडे अपात्र शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. अनेकांनी या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असल्याचे समाेर आले आहे. मात्र, आता त्यांच्याकडून हे पैसे वसूल करण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे. अनेक राज्य सरकारांनी अशा अपात्र शेतकऱ्यांनी रिकव्हरी नोटीस पाठवून या रकमेची वसूली सुरू केलीय.

Advertisement

अपात्र शेतकऱ्यांची संख्या

Advertisement
  • बनावट आधारकार्ड देऊन योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या- 3.86 लाख.
  • करदाते असतानाही लाभ घेणारे- 2.34 लाख
  • मृत शेतकऱ्यांची संख्या – 32 हजार

अशा प्रकारे विविध कारणांमुळे देशभरात 42 लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे सरकारचे एकूण 2900 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आलीय.

Advertisement

कशी वसुल करणार ही रक्कम
कृषी उपसंचालक कार्यालयात अपात्र शेतकऱ्यांना ही रोख रक्कम जमा करावी लागेल. रक्कम जमा केल्यावर त्यांना एक पावती दिली जाईल. नंतर, हा विभाग सरकारच्या खात्यात ही रक्कम जमा करील. त्यानंतर अपात्र शेतकऱ्यांचा डेटा ऑनलाइन पोर्टलवरुन हटविण्यात येणार आहे.

Advertisement

कोणाकडून परत घेणार रक्कम
– प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वत:च्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. दुसऱ्याची जमीन भाड्याने कसत असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतजमीन वडील वा आजोबांच्या नावावर असेल, तरी योजनेचा फायदा घेता येणार नाही. अशा शेतकऱ्यांकडून पैसे वसूल केले जातील.

Advertisement
  • केंद्र सरकार/ राज्य सरकार आणि PSUs मध्ये सध्या काम करणारे वा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ /चतुर्थ वर्गीय आणि ग्रुप डी कर्मचारी सोडून)
  • असे शेतकरी कुटुंब ज्यामधील एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती पुढील श्रेणीत येतात- व्यावसायिक डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सीए, आर्किटेक्ट मंडळी.
  • घटनात्मक पदावरील शेतकरी, आजी आणि माजी मंत्री, लोकसभा आणि राज्यसभा खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या योजनेच्या बाहेर आहेत.
  • केंद्र आणि राज्य सरकारमधील 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील शेतीसाठी या योजनेचा लाभ मिळत नाही.
  • एकाच कुटुंबातील अनेक लोक या योजनेचा वेगवेगळा फायदा घेऊ शकत नाहीत. आपल्यासह पती-पत्नी, भाऊ-बहीण यांच्यासाठी योजनेचा लाभ घेतला, तर ही रक्कम वसूल केली जाईल.
  • मागील वर्षात आयकर भरणारे शेतकरीदेखील या योजनेच्या बाहेर आहेत. त्यामुळे अशांनी देखील योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल.
  • चुकीची माहिती देऊन योजनेचा फायदा घेणाऱ्यांकडून देखील रक्कम परत घेतली जाईल.

सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढविण्याचा विचार..! मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय जाहीर करणार..
तालिबानी नेत्यांवर फेसबूकची मोठी कारवाई..! मोठा निर्णय घेतला.. त्याचा काय होणार परिणाम..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply