Take a fresh look at your lifestyle.

लॅपटॉप घ्यायचाय..? तर आलाय की हाही मस्त पर्याय, पहा Realme Book चे फिचर

मुंबई : स्मार्टफोन क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या चीनी कंपनी Realme ने आता भारतीय बाजारात लॅपटॉप विभागातही प्रवेश केला आहे. कंपनीचा पहिला Realme लॅपटॉप आज ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आला आहे. 2K डिस्प्ले आणि 11 व्या पिढीच्या इंटेल कोर प्रोसेसरयुक्त या लॅपटॉपमध्ये मस्त डिझाईनसाठी बारीक-बेझल्स देण्यात आले आहेत. ज्यामुळे स्क्रीन-टू-बॉडी रेशो 90 % इतका साध्य करण्यात यशस्वी झाली आहे. एवढेच नाही तर ग्राहकांना रिअलमी बुक स्लिममध्ये थंडरबोल्ट 4 आणि वाय-फाय 6 सारखी नवीनतम कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये मिळतील. पहा realme लॅपटॉपची भारतीय किंमत आणि या डिव्हाइसची सर्व वैशिष्ट्ये इथे.

Advertisement

या Realme लॅपटॉप मॉडेलमध्ये 14-इंच IPS डिस्प्ले आहे. जो 2K (2160×1440 पिक्सेल) रिझोल्यूशनसह सुसज्ज आहे आणि त्याचा आस्पेक्ट रेशो 3:2 आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, हा लॅपटॉप सध्या विंडोज 10 (विंडोज 11 मध्ये मोफत अपग्रेड) वर काम कार्यरत आहे. Realme ब्रँडच्या या लॅपटॉपचे प्रदर्शन 400 nits ची उच्च चमक देणाऱ्या लॅपटॉपपेक्षा 33 टक्के अधिक उजळ आहे. हा लॅपटॉप पातळ बेझल्ससह येतो. लॅपटॉपमधील उष्णता कमी करण्यासाठी कंपनीने ड्युअल-फॅन स्टॉर्म कूलिंग थर्मल मॅनेजमेंट सिस्टीम दिली आहे ज्यात दोन कॉपर पाईप्स आहेत.

Advertisement

कंपनीने या नवीनतम लॅपटॉपमध्ये पीसी कनेक्ट नावाचे फीचर प्री-इंस्टॉल केले आहे. ज्याच्या मदतीने वापरकर्ते त्यांचा फोन लॅपटॉपशी कनेक्ट करू शकतील आणि लॅपटॉपवर त्यांच्या फोनची स्क्रीन पाहू शकतील. Realme ब्रँडच्या या लॅपटॉपमध्ये कंपनीने बॅकलिट कीबोर्ड दिला आहे जो तीन-पोझिशन बॅकलिट अॅडजस्टमेंट आणि 1.3mm च्या प्रवासासह येतो. याशिवाय सुरक्षेसाठी 2-इन -1 फिंगरप्रिंट-पॉवर बटण देखील आहे.

Advertisement
फीचर्स
प्रोसेसर : Intel Core i5-1135G7, 8 GB RAM LPDDR4x
Harman Speakers
Battery : 54Wh, Laptop 65वॉट सुपर फास्ट चार्ज सपोर्ट, 11 तास
वजन 1.38 किलोग्राम
Realme Book Slim Price in India किंमत : रुपये 46,999 ते 59,999

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply