Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ PSU कंपनीत झुनझुनवालांना आलाय इंटरेस्ट; पहा किती टक्के केलीय गुंतवणूक

मुंबई : सुप्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी खरेदी केलेल्या कंपनीचे शेअर खरेदी करण्यात अनेकांना आनंद वाटतो. अजेकाज्न त्यांना फोलो करत असतात. त्याच झुनझुनवाला यांनी आता पीएसयू कंपनी सेलमधील (SAIL) आपला हिस्सा वाढवला आहे. जून तिमाहीत झुनझुनवाला यांनी सेलमधील आपला हिस्सा 1.93 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

Advertisement

या महिन्याच्या शेवटी त्याच्याकडे 5.75 कोटी शेअर्स होते. मार्च तिमाहीत शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये त्यांचे नाव नव्हते. म्हणजेच त्यांच्याकडे त्या वेळी विक्रीचे एक टक्क्यापेक्षा कमी शेअर्स असतील. गुंतवणूकदाराचे नाव एक टक्क्यापेक्षा जास्त हिस्सा धारण केल्यानंतरच उघड केले जाते. त्यानुसार आता त्यांनी या कंपनीत मोठी गुंतवणूक केल्याचे सपष्ट झालेले आहे. सध्या एलआयसी आणि म्युच्युअल फंडांसारखे गुंतवणूकदार या महाकाय स्टील कंपनीचे शेअर्स विकत आहेत. अशा वेळी राकेश झुनझुनवाला यांनी सेलमधील आपला हिस्सा वाढवला आहे.

Advertisement

एलआयसीने जून तिमाहीत 9.26 टक्क्यांवरून सेलमधील आपला हिस्सा 0.8 टक्क्यांनी कमी करून 8.43 टक्क्यांवर आणला आहे. तर मार्च तिमाहीत म्युच्युअल फंडांचा हिस्सा 5.67 टक्के होता. जो जून तिमाहीत 5.59 टक्क्यांवर आला आहे. खरं तर झुनझुनवाला सध्या सरकारच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढत्या गुंतवणुकीवर पैसे लावत आहेत. कोविडनंतर व्यावसायिक कार्यात तेजीमुळे स्टीलची मागणी वाढली आहे. त्याची किंमत भारतासह जगातील सर्व देशांमध्ये उंची गाठत आहे.

Advertisement

दरम्यान, सेलने म्हटले आहे की, ते आपल्या उत्पादन क्षमतेवर पूर्ण लक्ष देत आहेत. जेणेकरून यावेळी ते देश आणि जगात त्याच्या पुरवठ्याची गती राखू शकतील. जगभरात स्टीलच्या किमती वाढत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनी सध्या बाजारातील परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी आपली उत्पादन क्षमता मजबूत करण्यावर भर देत आहे. सेलच्या पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले आहेत. पहिल्या तिमाहीत कंपनीला 3,897 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत त्याचे 1226 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. मार्च तिमाहीतही कंपनीला 3470 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply