Take a fresh look at your lifestyle.

अखेर मोदी सरकारला आली कांदा-द्राक्ष उत्पादकांची दया; ‘तो’ प्रोत्साहन भत्ता सुरू झाल्याने लाभाची अपेक्षा

नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने शेतमाल निर्यात प्रोत्साहन भत्ता योजनेला ब्रेक लावला होता. त्यामुळे निर्यात करताना निर्यातदार व्यावसायिक आणि पुढे उत्पादक शेतकरी यांना होणारा लाभ बंद झाला होता. आता हीच शेतमाल निर्यात प्रोत्साहन भत्ता योजना सुरू झाली आहे. मात्र, याचा फायदा थेट काहीअंशी का होईना उत्पादकांना व्हावा अशीच अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

Advertisement

कृषिमालाच्या निर्यातीसाठी निर्यातदारांना दाेन टक्क्यांपासून तीन टक्क्यांपर्यंत प्रोत्साहन भत्ता देण्याबाबतचे परिपत्रक निघाल्याने निर्यातदार व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेकदा मागणी केल्यावर मग कुठे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला या योजनेला पूर्ववत करण्याची आवश्यकता भासली आहे. दोन वर्षांपूर्वी कांद्याचे दर वाढल्याने केंद्राने निर्यातबंदी न करण्याचे टाळून थेट प्रोत्साहन भत्ता बंद करण्याचा निर्णय झाला होता.

Advertisement

भारत दिघोळे (अध्यक्ष, कांदा उत्पादक संघटना) यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटलेय की, कांदा निर्यातीसाठी २ टक्के प्रोत्साहन अनुदान जाहीर केलेले आहे. मात्र, साठवणूक केलेल्या कांद्याचे नुकसान होत असल्याने हा भत्ता पाच टक्के करूनच खऱ्या अर्थाने कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल. केंद्राने कांदा निर्यातदारांना दाेन तर द्राक्ष निर्यातदारांना तीन टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना खुली केल्याने आता काहीअंशी का होईना दिलासा मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply