Take a fresh look at your lifestyle.

केंद्र सरकारने दिलाय की झटका; पहा LPG सिलिंडर कितीने वाढलाय ते, वर्षभरात ‘इतकी’ दमदार वाढ..!

पुणे : सरकारी तेल कंपन्यांकडून दर महिन्याच्या सुरुवातीला गॅसचे (LPG Gas Cylinder Price) दर बदलले जात असले तरी या वेळी महिन्याच्या मध्यावरही गॅसच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता दिल्लीत गॅस सिलेंडरची किंमत 859.50 रुपयांवर गेली आहे. वर्षात आतापर्यंत एलपीजी गॅसच्या किमतीत 265.50 रुपयांनी वाढ झाली आहे.

Advertisement

गॅस सिलिंडरच्या किमती मंगळवारीच वाढल्या आहेत. काही मीडिया हाऊसेसनेही यासंदर्भात बातम्या देण्यास सुरुवात केली आहे. परंतु, इंडियन ऑईलने बुधवारी सकाळी 9.30 पर्यंत आपल्या वेबसाइटवर नवीन किंमती अपडेट केलेल्या नाहीत. तथापि, जर तुम्ही गॅस बुकिंगची प्रक्रिया केली तर तुम्हाला कळेल की तुम्हाला आता गॅस सिलिंडरसाठी आणखी 25 रुपये मोजावे लागतील.

Advertisement
शहर किंमत
दिल्ली 859.5 रुपये
मुंबई 859.5 रुपये
कोलकाता 886 रुपये
चेन्नई 875.5 रुपये
लखनऊ 857.5 रुपये
अहमदाबाद 866.50 रुपये

 

Advertisement

वर्षभरात अशी वाढ झाली किमतीत :

Advertisement
तारीख कीमत
1 ऑगस्ट 2020 594 रुपये
1 डिसेंबर 2020 644 रुपये
15 डिसेंबर 2020 694 रुपये
4 फेब्रुवारी 2021 719 रुपये
15 फेब्रुवारी 2021 769 रुपये
25 फेब्रुवारी 2021 794 रुपये
1 मार्च 2021 819 रुपये
1 एप्रिल 2021 809 रुपये
1 जुलै 2021 834.50 रुपये
17 ऑगस्ट 2021 859.5 रुपये

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply