Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. महाराष्ट्रातही तालिबानी राजवट; पहा आरोग्याधिकाऱ्यांनी नोटीस पाठवण्याचा काय प्रताप केलाय..!

अहमदनगर : राजकीय व सामाजिक जीवनातील असो किंवा कोणत्याही क्षेत्रातील वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करणे हेच पत्रकारांचे कर्तव्य असते. हिंदी आणि इंग्रजी माध्यमातील भाट पत्रकार सध्या केंद्राचे प्रसिद्धी अधिकारी बनून हेच कर्तव्य विसरले आहेत. मात्र, महाराष्ट्र राज्यात मराठी माध्यमातून अजूनही पत्रकारिता जिवंत आहे. मात्र, अशा पत्रकारांनी पत्रकार परिषदेत प्रश्न केला म्हणून थेट तालिबानी स्टाईल कार्यक्रम करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Advertisement

Advertisement

अहमदनगर महापालिका नावाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत असा प्रकार घडला आहे. सध्या ही महापालिका भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेऊन महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याप्रकरणी आक्रमक बाणा दाखवला आहे. उपाध्ये यांनी ट्विटरवर महापालिकेचे अजब पत्र टाकताना महाराष्ट्रात तालिबानी राजवट लागू झाल्याचा मुद्दा मांडला आहे.

Advertisement

उपाध्ये यांनी म्हटलेय की, महाराष्ट्रात तालीबानी राजवट..? पत्रकारांनो, प्रश्न विचाराल तर नोटीस पाठवू. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना यांना लसीकरणाबाबत प्रश्न विचारला म्हणून शिवसेनेचे महापौर असलेल्या अहमदनगर महापालिकेने पत्रकारांना नोटीस बजावली आहे. 15 ऑगस्टला ‘सामना’चे प्रतिनिधि मिलिंद देखणे यांनी मुश्रीफ यांना प्रश्न विचारले म्हणुन त्यांना महापालिकेने नोटीस पाठवली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply