Take a fresh look at your lifestyle.

सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढविण्याचा विचार..! मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय जाहीर करणार..

देशातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी महत्वपूर्ण बातमी आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने नुकत्याच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत.

Advertisement

त्यात शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी काम करण्याची वयोमर्यादा वाढविण्याचा विचार सुरु आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या म्हणण्यानुसार, देशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यासह युनिव्हर्सल पेन्शन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे.

Advertisement

जागतिक लोकसंख्या प्रॉस्पेक्टस 2019 नुसार, भारतात 2050 पर्यंत सुमारे 32 कोटी ज्येष्ठ नागरिक असतील. हे प्रमाण देशाच्या लोकसंख्येच्या सुमारे 19.5 टक्के असेल. 2019 मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या 10 ते 14 कोटी लोक ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत आहेत.

Advertisement

देशातील ज्येष्ठ नागरिकांचे उतार आयुष्य चांगल्या प्रकारे व्यतीत व्हावे, यासाठी आर्थिक सल्लागार समितीने बाजू मांडली आहे. कामकाजासाठी सेवानिवृत्तीचे वय वाढविणे आवश्यक आहे. अहवालात 50 वर्षांवरील व्यक्तींच्या कौशल्य विकासाबद्दलदेखील सांगितले आहे. या अहवालानुसार, कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 2000 रुपये पेन्शन दिली जावी, असे म्हटले आहे.

Advertisement

केंद्र आणि राज्य सरकारांनी ज्येष्ठ कर्मचाऱ्यांसाठी अशी धोरणे बनवावीत, की जेणेकरून त्यांचा कौशल्य विकास होऊ शकेल. या प्रयत्नात असंघटित क्षेत्र, दुर्गम भागात राहणारे, निर्वासित, स्थलांतरित ज्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याचे साधन नाही, त्यामुळे त्यांचाही समावेश असावा, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

निवृत्ती वय वाढविल्यास पेन्शनवर होणारा खर्च कमी होऊ शकतो, अशी चर्चा आराखडा तयार करणाऱ्या समितीत सुरू आहे. सरकारी नोकरीत रुजू होण्याच्या वयात वेळोवेळी वाढ झाली. मात्र, त्या तुलनेत सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षे कायम आहे. ते वाढविण्याची मागणी कर्मचाऱ्यांच्या संघटनेनेही केली आहे.

Advertisement

तालिबानी नेत्यांवर फेसबूकची मोठी कारवाई..! मोठा निर्णय घेतला.. त्याचा काय होणार परिणाम..?
‘स्वयंभू’चा रक्तदान महायज्ञ अविरत चालू; रक्ताचे नाते जपण्यासाठी तरुणांचा पुढाकार

Advertisement
Advertisement

Leave a Reply