Take a fresh look at your lifestyle.

तालिबानी-पाकिस्तान्यांना झटका देण्यासाठी भारतमित्र सज्ज; अगोदरच अहवालात त्यांनी ‘वास्तव’ केले होते सूचित..!

दिल्ली : अफगाणिस्तानात अनेक दशकांपासून बंडखोरांचा गड असलेल्या पंजशीर खोऱ्यातील एका मुलाने आता तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे वचन अफगाणी जनतेला दिले आहे. तालिबानचे सर्वात मोठे शत्रू आणि अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी हे आव्हान स्वीकारले आहे. अशरफ गनी देश सोडून पळून गेल्यानंतर सालेह यांनी स्वतःला अफगाणिस्तानचे राष्ट्रपती घोषित केले आहे.

Advertisement

सालेह यांनी अनेकदा पाकिस्तानवर हल्ला करताना भारताचा जवळचा मित्र म्हणून वेळोवेळी उल्लेख केला आहे. एवढेच नाही तर तालिबानने अनेक वेळा त्यांना ठार मारण्याचा प्रयत्नही केला आहे. या सगळ्याची पर्वा न करता, सालेह यांनी पुन्हा तालिबानच्या विरोधात युद्ध जाहीर केले आहे. अफगाणिस्तानच्या उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी अमरुल्ला सालेह देशाच्या गुप्तचर संस्था एनडीएसचे प्रमुख होते. ताजिक वांशिक गटाचे ते आहेत. अमरुल्ला यांना एक बहीण होती. बहिणीवर तालिबानी दहशतवाद्यांनी क्रूरपणे अत्याचार केले होते.

Advertisement

1990 च्या दशकात जेव्हा सोव्हिएत सैन्याने अफगाणिस्तानात प्रवेश केला. तेव्हा सालेहने पाकिस्तानात शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतले आणि कमांडर अहमद शाह मसूदच्या नेतृत्वाखाली ते लढले. जेव्हा तालिबान अफगाणिस्तानात पसरू लागला, तेव्हा सालेह मसूदच्या नेतृत्वाखाली त्याने तालिबानविरुद्धच्या युद्धात उडी घेतली. यानंतर सालेहने भारताशी मैत्री वाढवली. त्यांनी त्यावेळी अहमद शाह मसूदला भारतीय अधिकाऱ्यांना भेटायला मदत केली होती. 2001 मध्ये अमेरिकेवर हल्ला झाल्यानंतर सुरू झालेल्या तालिबानच्या विरोधातील अमेरिकेच्या लष्करी मोहिमेदरम्यान ते गुप्तचर संस्थांचे प्रभारी होते आणि अमेरिकेला त्यांनी मदत केली होती.

Advertisement

2006 मध्ये सालेह एनडीएसचे प्रमुख असताना तालिबानवर ग्राउंड सर्वेक्षण केले. त्यात आढळले की हे दहशतवादी पाकिस्तानमध्ये सक्रिय आहेत आणि तेथून हल्ला करतात. त्यांनी आपल्या अभ्यासाला अहवालाचे स्वरूप दिले. त्याला ‘तालिबान रणनीती’ असे नाव देण्यात आले. त्यात सालेहच्या टीमने लिहिले की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने 2005 मध्ये तालिबानला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि रोख आणि पैसे पुरवले. दरम्यान, अफगाणिस्तानच्या हमीद करझाई सरकारने भारताला आपला मित्र मानण्यास सुरुवात केली. ज्यामुळे पाकिस्तान भडकला. यानंतर पाकिस्तानने तालिबानचे संगोपन सुरू केले. अमेरिकन-नाटो सैन्य कमी झाल्यावर तालिबान हल्ला करेल असे सालेहच्या अहवालात म्हटले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply