Take a fresh look at your lifestyle.

कोविड लस विक्रीच्या मुद्द्यावर रंगलाय वेगळाच ‘सामना’; पहा शिवसेनेच्या ताब्यातील महापालिकेतच काय घडलाय प्रकार

अहमदनगर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या पत्रकार परिषदेत कोविड १९ च्या लसीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावरून आता मोठाच गहजब उडाला आहे. पत्रकारांनी खुलासे विचारले म्हणून आता त्यांनाच खुलासे मागवण्याचा प्रकार सुरू झाला आहे. महापालिका कार्यक्षेत्रात आरोग्याच्या बाबतीत अनागोंदी लक्षात घेऊन ठोस कार्यवाही करण्याचे सोडून थेट पत्रकारांना नोटीस काढली गेल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Advertisement

Advertisement

महापालिका प्रशासनाकडून लसीकरण कार्यक्रम राबविताना अनेक गडबडी झाल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. तसेच काही ठिकाणांहून तर लस बाहेर विकली गेल्याबाबतचा प्रश्न दैनिक ‘सामना’चे पत्रकार मिलिंद देखणे यांनी उपस्थित केल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकाराने महापालिकेचे आरोग्य अधिकारी चक्रावले आहेत की काय असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण, पत्रकार मिलिंद देखणे यांनी थेट पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा प्रश्न विचारल्याने महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी चौकशीचे निर्देश दिले आहेत. त्यावर आरोग्य अधिकारी  डॉ. सतीश राजूरकर यांनी मिलिंद देखणे यांनाच नोटीस बजावत संबधित प्रकरणी खुलासा मागविला आहे.

Advertisement

आरोग्य अधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, ‘मनपाच्या लसीकरण केंद्रामधून लस बाहेर विकली जाते, अशी प्रश्नवजा तक्रार आपण केली आहे. ही बाब आपण मनपा प्रशासनाच्या लक्षात आणून न देता थेटपणे पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत विचारणे उचित नाही. ही बाब आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल व उत्साह खच्चीकरण करणारी आहे. आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने इत्यंभूत माहिती आणि पुरावे तीन दिवसांच्या आत सादर करावेत.

Advertisement

सध्या महाराष्ट्र राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आहे. अहमदनगर महापालिकेतही सध्या शिवसेनेच्या महापौर आहेत. अशावेळी शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या प्रतिनिधीलाच महापालिका प्रशासनाने नोटीस पाठवण्याची कार्यवाही केली आहे. यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संताप व्यक्त करून महाराष्ट्रात थेट तालिबानी राजवट लागू झाल्याकडे लक्ष वेधले आहे. आपल्याच कार्यक्षेत्रात काय चालू आहे याचे आकलन करून घेण्यासाठी आरोग्य अधिकारी यांनी थेट पत्रकारांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केल्याने आता याप्रकरणी कोणता राजकीय व प्रशासकीय सामना रंगणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply