Take a fresh look at your lifestyle.

अखेर महापालिका आरोग्यधिकाऱ्यांचे डोके आलेच ठिकाणावर; पहा काय म्हटलेय नव्या पत्रात

अहमदनगर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेत कोविड १९ च्या लसीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावरून पत्रकार मिलिंद देखणे यांना आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी पाठवलेली नोटीस राज्यभरात चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे अखेरीस सर्वच बाजूने आलेल्या दबावाने आणि टीकेने महापालिका प्रशासनाचे डोके ठिकाणावर आलेले आहे. त्यांनी नव्या पत्रात थेट दिलगिरी व्यक्त केली आहे.

Advertisement

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत यावर टीका केली होती. महाराष्ट्रात तालीबानी राजवट..? पत्रकारांनो, प्रश्न विचाराल तर नोटीस पाठवू. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना यांना लसीकरणाबाबत प्रश्न विचारला म्हणून शिवसेनेचे महापौर असलेल्या अहमदनगर महापालिकेने पत्रकारांना नोटीस बजावली आहे. 15 ऑगस्टला ‘सामना’चे प्रतिनिधि मिलिंद देखणे यांनी मुश्रीफ यांना प्रश्न विचारले म्हणुन त्यांना महापालिकेने नोटीस पाठवली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातून याप्रकरणी अनेकांनी निषेध व्यक्त केला होता.

Advertisement

Advertisement

त्यामुळे आता नव्या पत्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटलेय की, जे पत्र दिले त्यातील मजकूर हा अनवधानाने लिहिला गेला होता. त्यामुळे पत्रकार मिलिंद देखणे यांच्या भावना दुखावल्या गेल्या. सदरचे पत्र रद्द करण्यात येत असून मी मागे घेत आहे. याबाबत मी व्यक्तिश: दिलगिरी व्यक्त करीत आहे. अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष आणि नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के यांनाही या नव्या पत्राची एक प्रत देण्यात आलेली आहे.

Advertisement

महापालिका प्रशासनाकडून लसीकरण कार्यक्रम राबविताना अनेक गडबडी झाल्या आहेत. तसेच काही ठिकाणांहून तर लस बाहेर विकली गेल्याबाबतचा प्रश्न दैनिक ‘सामना’चे पत्रकार मिलिंद देखणे यांनी उपस्थित केल्यावर महापालिका प्रशासनाने या चुका सुधारण्याची तसदी न घेता थेट पत्रकारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. अगोदरच्या नोटीसीत म्हटले होते की, ‘मनपाच्या लसीकरण केंद्रामधून लस बाहेर विकली जाते, असा प्रश्नवजा तक्रार आपण केली आहे. ही बाब आपण मनपा प्रशासनाच्या लक्षात आणून न देता थेटपणे पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत विचारणे उचित नाही. ही बाब आरोग्य कर्मचार्यांचे मनोबल व उत्साह खच्चीकरण करणारी आहे. आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने इत्यंभूत माहिती आणि पुरावे तीन दिवसांच्या आत सादर करावेत.’

Advertisement
Advertisement

Leave a Reply