Take a fresh look at your lifestyle.

तालिबान्यांच्या विरोधात ‘तो’ बडा देशही आक्रमक; पहा झटका देण्यासाठी काय आहे धोरण..!

दिल्ली : रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटेन आहा देश पल्या सहकारी देशांबरोबर मिळून तालिबान्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासह अफगाणिस्तानला देण्यात येणारा विकास सहायता निधी पूर्णपणे रोखण्याचाही निर्णय घेण्याचे सुतोवाच ब्रिटेनचे परराष्ट्र मंत्री डॉमनिक रॉब यांनी सांगितले आहे.

Advertisement

अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी तालिबानच्या राजवटीस चीन, पाकिस्तानसारखे काही मुजोर देश मान्यता देण्याच्या विचारात आहेत. अशावेळी ब्रिटेनने मात्र तालिबानच्या डोकेदुखीला वाढवण्याची तयारी केली आहे. ब्रिटेनने तालिबानच्या राजवटीस स्पष्ट विरोध केला करताना माथेफिरू तालिबान्यांना रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट म्हटले आहे.

Advertisement

डॉमनिक रॉब यांनी म्हटलेय की, पुढील काळात तालिबानची वागणूक कशी राहील यावरही बरेच काही अवलंबून असेल. त्यांच्याकडून राष्ट्रविरोधी कारवाया होत असल्याचे निदर्शनास आल्यास वित्तपुरवठा रोखण्याचा पर्याय आहे. तालिबान सध्या ज्या पद्धतीने कब्जा करत आहे. ते चिंता वाढवणारे आहे. हे सगळे इतक्या लवकर होईल याचा अंदाज कुणालाही नव्हता. तालिबानच्या या पद्धतीच्या कारवाईची अगोदरच माहिती असती तर त्यानुसार कारवाई केली असती. आता तालिबानबरोबर ब्रिटेन सरकार थेट कोणतेही व्यवहार करणार नाही. तसेच पश्चिमी देशात दहशतवाद पसरवण्यासाठी अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर होऊ नये यासाठीचे प्रयत्न असतील.

Advertisement

अफगाणिस्तानमधून अमेरिकेने माघार घेतल्यानंतर आता या देशात तालिबानची राजवट आहे. चीन, पाकिस्तान, बांग्लादेश, रशिया या देशांनी तालिबान शासनास मान्यता देण्याचे सुतोवाच केले आहेत. तालिबानी सत्ताधारी यांच्या मुद्द्यावर आता जगात दोन गट पडले आहेत. अफगाणिस्तानच्या परिस्थितीचा राजकारणासाठी फायदा घेण्याचा प्रत्येक देशाचा प्रयत्न करीत असल्याने या देशातील नागरिक विनाकारण भरडले गेले आहेत. याकडे अवघ्या जगाचे दुर्लक्ष होत आहे. आता अमेरिकेवर जगभरातून प्रचंड टीका होत असताना राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या मुद्द्यावर मत व्यक्त करताना अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा दोष अफगाणिस्तानचे राष्ट्रपती आणि अफगाण सेनेवर टाकला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply