Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रातील व्यापारी मार्गही अदानी समूहाच्या ताब्यात.. देशातील अन्य विमानतळेही हा समूह ताब्यात घेणार..!

मुंबई : अदानी समूहाने काही दिवसांपूर्वीच मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापाठोपाठ राज्यातील व्यापारी मार्गही अदानी समूहाच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या वा महाराष्ट्रात येणाऱ्या व्यापारी वाहतुकीवरील ‘सेवा शुल्क’ वसुलीचे अधिकार अदानी समूहाला मिळाले आहेत.

Advertisement

महाराष्ट्राला लागून असलेल्या सहा राज्यांच्या सीमेवरील तपासणी नाक्यांच्या प्रकल्पांचा कारभार आता अदानी समूह पाहणार आहे. या सर्व मार्गावर 24 तपासणी नाके उभारुन व्यापारी मालवाहतुकीवरील सेवा शुल्क संकलनाचे अधिकार ‘सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लिमिटेड’कडे होता. मात्र, आता अदानी समूहाने या कंपनीतील 49 टक्के वाटा विकत घेतला आहे. त्यासाठी 1680 कोटी रुपये मोजल्याचे माहिती देण्यात आली.

Advertisement

दरम्यान, मुंबई विमानतळ व्यवस्थापनात अदानी समूहाचा 74 टक्के हिस्सा असणार आहे. जीव्हीके समूहाचा संपूर्ण 50.5 टक्के हिस्सा या समूहाने यापूर्वीच घेतला आहे. आणखी 23.5 टक्के हिस्सा हा एअरपोर्ट कंपनी साऊथ आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूह या अन्य अल्पसंख्य भागीदारांकडून खरेदी करणार असल्याचे अदानी समूहाकडून सांगण्यात आले.

Advertisement

देशातील चार प्रमुख विमानतळांचा कारभार आता अदानी समूहाच्या हातात गेलाय. यापूर्वी लखनऊ, मंगळुरू आणि अहमदाबाद विमानतळाचे नियंत्रण अदानी समूह पाहत होता. त्यानंतर अदानी समूहाच्या अखत्यारित गेलेले मुंबई हे चौथे विमानतळ आहे. यानंतर जयपूर, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम ही विमानतळेही अदानी समूहाच्या ताब्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

ही सर्व विमानतळे पुढील 50 वर्षे अदानी समूहाच्या ताब्यात असतील. या काळात या विमानतळांचा विकास, प्रशासकीय कामकाज आणि देखभालही अदानी समूह करणार आहे. अदानी समूहाकडून देशातील अधिकाअधिक विमानतळांचा कारभार हाती घेण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

मोदी सरकारने दुचाकीस्वारांसाठी केले नवे नियम, बाईकवर मागे बसण्यापूर्वी हे नियम वाचा, नाहीतर बसेल दंडाचा फटका..
पैलवान बबिता फोगटला नेटीझनने दिलेय असेही प्रत्युत्तर; पहा मोदींच्या कौतुकासाठी काय पाजळली होती अक्कल

Advertisement
Advertisement

Leave a Reply