Take a fresh look at your lifestyle.

चहाच्या घोटाने वाजतील आरोग्याचे बारा.. पाहा किती नुकसानकारक आहे चहा..

अनेकांच्या घरात सकाळ उजाडते, ती गरमागरम चहाने. चहा माहित नाही, वी चहा प्यायलेला नाही, असा माणूस शोधूनही सापडणार नाही. ब्रिटीशांसाेबत आलेले हे पेय आता भारतात चांगलेच स्थिरावले आहे. चहाच्या आवडीचे चक्क व्यसन झाले आहे.

Advertisement

अति तेथे माती.. ही म्हण चहालाही लागू होते. कारण, एकदा का चहा पिण्याची सवय लागली, की त्याचे कधी व्यसन होते, हे कळतही नाही. तुम्हीही चहा पिण्याचे शौकीन असाल, तर त्यामुळे होणाऱ्या आरोग्याची हानी आताच माहिती असणे आवश्यक आहे.

Advertisement

चहामुळे होणारे नुकसान

Advertisement
  • चहा पावडरीमध्ये निकोटीन वा कॅफीन असते. त्याचे सेवन केल्यास पोटात आम्ल तयार होते. वारंवार चहा पिण्याने पोटात गॅस, अॅसिडिटीची समस्या सुरू होते. पचन क्रिया मंदावते नि संपूर्ण पाचन तंत्र विस्कळित होते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास अनेक वेळा मळमळते, अस्वस्थ वाटते.
  • चहामधील कॅफीनमुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते; पण ही ऊर्जा जितक्या वेगाने शरीरात येते, त्याच वेगाने निघून जाते. काम करताना ऊर्जा मिळावी, यासाठी आपण सतत चहाचे प्याले रिचवत राहतो नि शरीरात निकोटीन, कॅफीनचे प्रमाण वाढते. त्यामुळे रात्रीची झोप उडते. पुरेशी झोप न झाल्याने शरीरात थकवा, राग, चिडचिड, तणाव अशा समस्या निर्माण होतात.
  • चहा जास्त पिण्याचे आणखी एक नुकसान म्हणजे सांधेदुखी. जास्त चहा प्यायल्याने हाडांवर नकारात्मक परिणाम होतो. तुमचे शरीर आतून पोकळ होते. त्यामुळे सांधेदुखीची समस्या कमी वयातच जाणवू लागते.
  • अनेक जण तोंडाला चटका बसेल, इतका गरम, कडक चहा पितात. मात्र, त्यामुळे तोंडात फोड येतात. त्यातून तोंड येण्याची शक्यता असते. शिवाय गरम चहामुळे पोटातील पृष्ठभागालाही जखम होऊ शकते. वारंवार गरम चहा पिण्याने अल्सरसारखा आजार उद्भवू शकतो.
  • काही जण भूक मारण्यासाठी चहाचा घोट घेतात. मात्र, रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने हृदयाचा वेग वाढतो, कारण चहामध्ये असलेले कॅफीन शरीरात खूप वेगाने विरघळते. त्यामुळे रक्तदाब प्रभावित होतो. त्यातून हृदयविकार बळावण्याची शक्यता असते.

मोदी सरकारने दुचाकीस्वारांसाठी केले नवे नियम, बाईकवर मागे बसण्यापूर्वी हे नियम वाचा, नाहीतर बसेल दंडाचा फटका..
डाळिंब बाजारभाव : पहा कोणत्या मार्केटला मिळतोय Rs 150/Q चा भाव

Advertisement
Advertisement

Leave a Reply