Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारने दुचाकीस्वारांसाठी केले नवे नियम, बाईकवर मागे बसण्यापूर्वी हे नियम वाचा, नाहीतर बसेल दंडाचा फटका..

मुंबई : रस्ते अपघातात होणारे मृत्यू रोखण्यासाठी सरकार वेळोवेळी सुरक्षेचे नियम बदलत असते. मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत रस्तासुरक्षेचे नियम कडक करण्यावर भर दिला आहे. वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी मोठ्या दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे.

Advertisement

मोदी सरकारने आताही रस्ते अपघात टाळण्यासाठी दुचाकींचे डिझाईन, तसेच मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी नियमांत काही बदल केले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) हे नवीन नियम लागू केले आहेत. त्याचे पालन न करणाऱ्यास मोठा दंड भरावा लागू शकतो. मोदी सरकारने कोणते नवे नियम केले आहेत, त्याचा घेतलेला आढावा..

Advertisement

दुचाकीस्वारांसाठी नवे नियम

Advertisement
  • रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या नवीन नियमांनुसार, आता दुचाकीच्या मागील सीटच्या दोन्ही बाजूंना हात धरण्यासाठी होल्डर आवश्यक असणार आहे. या हँड होल्डरमुळे बाईकच्या मागे बसलेल्या लोकांना घट्ट बसता येईल. दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक लावल्यास हे हॅंड होल्डर उपयुक्त ठरणार आहे.
  • दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तींसाठी दोन्ही बाजूंनी कव्हर असणे अनिवार्य केले आहे. जेणेकरून मागील व्यक्तीचे कपडे मागील चाकात अडकू नये.
  • बाईकमध्ये आता हलका कंटेनर बसविण्याच्या सूचना केंद्राने केल्या आहेत. या कंटेनरची लांबी 550 मिमी, रुंदी 510 मिमी आणि उंची 500 मिमीपेक्षा जास्त नसावी. जर हा कंटेनर बाईकच्या मागच्या बाजूला ठेवला असेल, तर फक्त चालकालाच बाईकवर बसण्याची परवानगी असेल. बाईकच्या मागे दुसऱ्याला बसता येणार नाही. तसे आढळल्यास कारवाई केली जाईल. हा कंटेनर मागील प्रवाशांच्या बसण्याच्या जागेच्या मागे ठेवला असेल, तर दुसऱ्या व्यक्तीला बसण्यास परवानगी असेल.
  • जास्तीत जास्त 3.5 टन वजनाच्या वाहनांसाठी ‘टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम’ सुचविली आहे. या यंत्रणेतील सेन्सरच्या माध्यमातून चालकाला वाहनाच्या टायरमधील हवेच्या दाबाची माहिती मिळणार आहे. तसेच टायर दुरुस्ती किटची शिफारस केली आहे. त्याच्या अंमलबजावणीनंतर टायर संबंधीचे प्रॉब्लेम्स बाईक चालकाला येणार नाहीत.

बाब्बो.. म्हणून मोदींच्या ‘त्या’ महत्वाकांक्षी योजनेला लागला ब्रेक; तब्बल 5.82 कोटी खाते निष्क्रिय..!
बाब्बो.. म्हणून सेंसेक्सने ओलांडला 55,555.55 चाही आकडा; पहा काय चाललेय शेअर बाजारात..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply