Take a fresh look at your lifestyle.

सोन्याला झळाळी, चांदीची चमकही वाढली..! रुपयाची मात्र घसरण, सराफा बाजारातील स्थिती पाहा

नवी दिल्ली : कोरोनातून जग आता सावरले आहे. त्याचा परिणाम बाजारात दिसत आहे. आर्थिक सुधारणांना आता पुन्हा एकदा चांगली गती मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतील पुनर्प्राप्तीचा परिणाम भारतातील सराफा बाजारपेठेवरही दिसत आहे. भारतीय बाजारात आज (ता. 17) सोने प्रति तोळा 446 रुपये, तर चांदी किलाेमागे 888 रुपयांनी महाग झाली. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा बंद भाव 46,460 रुपये प्रति दहा ग्रॅम, तर चांदीचा भाव 62,452 रुपये प्रति किलोवर बंद झाला.

Advertisement

आज सकाळी मनी मार्केट उघडताच, रुपया 11 पैशांनी घसरून डॉलरच्या तुलनेत 74.35 वर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने 1,796.65 डॉलर प्रति औंस होते, तर चांदी 23.872 डॉलर प्रति औंसवर व्यापार करीत होती. कोरोनाच्या डेल्टा प्रकारात वाढ झाल्यानंतर सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे मत एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी व्यक्त केले.

Advertisement

‘एमसीएक्स’वर(MCX) आज सोने-चांदीमध्ये वाढ दिसून आली. ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोने 211 रुपयांच्या वाढीसह 47436 रुपये प्रति दहा ग्रॅम, तर डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोने 224 रुपयांनी वाढून 47626 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले होते. सप्टेंबर डिलिव्हरीसाठी चांदी सध्या 153 रुपयांच्या वाढीसह 63610 रुपये प्रति किलोवर, तर डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदी 173 रुपयांनी वाढून 64,381 रुपये प्रति किलो झाली होती.

Advertisement

पैलवान बबिता फोगटला नेटीझनने दिलेय असेही प्रत्युत्तर; पहा मोदींच्या कौतुकासाठी काय पाजळली होती अक्कल
मोदी सरकारने दुचाकीस्वारांसाठी केले नवे नियम, बाईकवर मागे बसण्यापूर्वी हे नियम वाचा, नाहीतर बसेल दंडाचा फटका..

Advertisement
Advertisement

Leave a Reply