Take a fresh look at your lifestyle.

पैलवान बबिता फोगटला नेटीझनने दिलेय असेही प्रत्युत्तर; पहा मोदींच्या कौतुकासाठी काय पाजळली होती अक्कल

मुंबई : सध्या काहीही असो त्याचे क्रेडीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात भाजपचा हातखंडा आहे. आताही अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर पैलवान आणि भाजप नेता बबिता फोगट यांनी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य करून टाकले आहे. त्यामुळे अनेकांनी या भाजप नेत्या फोगाट यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहरावर तालिबानने नियंत्रण मिळवल्याने उडालेल्या गोंधळावर सध्या अवघे विश्व चिंता व्यक्त करीत आहे. अशावेळी अभिनेत्री कंगना राणावत हिने मोदी नसतील तर आज अफगाणिस्तानचे जे झालं ती वेळ आपल्यावर येऊ शकते, असे ठोकून दिलेले आहे. त्यावर कहर म्हणून फोगाट यांनी अफगाणिस्तानकडे स्वस्तातले पेट्रोल, डिझेल होते. स्वस्त दरातला कांदाही होता. मात्र त्यांच्याकडे नरेंद्र मोदींसारखा नेता नव्हता, अशी अक्कल पाजळली आहे.

Advertisement

Advertisement

लोकमत आणि बीबीसी मराठी यांनी याबाबतची बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. शशांक कार्यकर्ते यांनी म्हटलेय की, आपला देश मोदींमुळे नाही संविधान व कायद्याच्या राज्यामुळे व आपण दिलेल्या टॅक्स वर चालतो. तर, सुहास मोहोड म्हणतात की, धर्मान्धता क्या है अफगानिस्तान को देखकर समझा जा सकता। कुछ हद तक भारत उस ओर बढ़ चुका है। अब भी संभलने का समय है। नेता कोई भी हो धर्म के आगे नही जा पायेगा | यासह संग्राम पेटकर यांनी म्हटलेय की, भारताकडे मोदी आहे मग चीन कसा काय आत आला. जशोदाबेन का सोडून गेल्या या विधानात मोदींची किंमत झालेली होती पण बबिताजी आप महान भक्त हो.

Advertisement
Advertisement

Leave a Reply