Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून ट्रम्प भडकलेत बायडेन यांच्यावर; पहा नेमके काय संकट आलेय अवघ्या जगावरच

दिल्ली : अमेरिकेने अफगाणिस्तान मधून माघार घेतल्यानंतर काही दिवसातच अफगाणिस्तान सरकारने तालिबानसमोर शरणागती पत्करली. त्यामुळे आता अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अमेरिकेने माघार घेतल्यानंतर देशाची अशी अवस्था झाल्याने जगभरात अमेरिकेची बदनामी होत आहे. अफगाणिस्तानच्या नागरिकांनी यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना दोषी धरले आहे. त्यानंतर आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जो बायडेन यांच्यावर आगपाखड केली आहे. बायडेन यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही ट्रंप यांनी केली आहे.

Advertisement

तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलवरही कब्जा केला आहे. त्यामुळे आता देशात पूर्णपणे तालिबानचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यानंतर ट्रंप यांनी बायडेन यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, की आता बायडेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली आहे. अफगाणिस्तानात घडणाऱ्या घडामोडी, अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, अर्थव्यवस्थेस बसलेला फटका अशा समस्या निर्माण झाल्याने आता बायडेन यांनी राजीनामा देण्याची वेळ आली आहे.

Advertisement

Advertisement

दरम्यान, अमेरिकेने या देशातून सैन्य मागे घेतल्यानेच अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. येथील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच स्फोटक होत आहे. सध्याच्या परिस्थितीत तालिबानला रोखणे सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे अमेरिकेने पुन्हा आपले सैन्य अफगाणिस्तान मध्ये पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हा निर्णय घेतल्याचे बायडेन प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Advertisement

अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या दुतावासातील कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी थेट सैन्याला पाचारण करण्यात येणार आहे. दुतावासातील कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी संरक्षण मंत्रालय सैन्य पाठवणार आहे. साधारण 3 हजार सैनिक असतील. येथील अमेरिकन नागरिकांना पुन्हा मायदेशात येण्यास जर कुणी आडकाठी आणत असेल तर सैन्य तत्काळ कारवाई करेल, असा इशाराही देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त ब्रिटन सुद्धा अशाच पद्धतीने अफगाणिस्तान मध्ये सैन्य पाठवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रिटन आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी जवळपास 6 हजार सैनिक अफगाणिस्तानात धाडणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply