Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. भयंकरच की.. महिलांना ‘असे’ लक्ष्य केले जातेय तालिबानी राज्यात; अवघ्या जगामध्ये व्यक्त होतेय चिंता

दिल्ली : जुलैमध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकन आणि नाटो सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने देशाच्या मोठ्या भागावर अधिकाधिक नियंत्रण मिळवले आहे. अध्यक्ष पळून गेले आणि सरकार पडले, अशी तिथे विदारक परिस्थिती आहे. अफगाण सैन्याने आत्मसमर्पण केल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय दबाव कमी झाल्यानंतर उत्साही तालिबानने आपला हिंसाचार तीव्र केला आहे. यावेळी अफगाणिस्तानमध्ये अराजकाचे वातावरण आहे. विमानतळापासून इतर ठिकाणी गर्दी आहे. क्रूर तालिबानच्या वाढत्या ताकदीमुळे अफगाण महिलांमध्ये भीतीही निर्माण झाली आहे.

Advertisement

जुलैच्या सुरुवातीला तालिबानच्या नेत्यांनी बदाखशान आणि तखार प्रांतांवर नियंत्रण मिळवून स्थानिक धार्मिक नेत्यांना 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि 45 वर्षांखालील विधवांची यादी तालिबानी लढाऊंसोबत विवाहासाठी देण्याचे आदेश जारी केले. त्याच्या आदेशांची अंमलबजावणी झाली आहे की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, जबरदस्तीने विवाह झाल्यास महिला आणि मुलींना पाकिस्तानच्या वझिरिस्तानमध्ये नेले जाईल आणि त्यांना पुन्हा इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. याच्या बातम्या सध्या वेगाने येत आहेत.

Advertisement

Advertisement

वृंदा नारायण (सहयोगी प्राध्यापक, विधी विद्याशाखा, मानवी हक्क आणि कायदेशीर बहुलवाद केंद्र) यांनी एका चर्चेदरम्यान म्हणाले की, या आदेशाने या भागात राहणाऱ्या महिला आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये तीव्र भीती निर्माण झाली आहे. त्यांना याअंतर्गत विस्थापित व्यक्ती म्हणून वागणूक दिली जात आहे. मानवता विघातक आपत्ती अफगाणिस्तानमध्ये आपले पाय पसरत आहे आणि केवळ गेल्या तीन महिन्यांत अनेक हजार लोक विस्थापित झाले आहेत. त्यामुळे जगभरातून भीती व्यक्त होत आहे.

Advertisement

तालिबानचे हे निर्देश म्हणजे पुढे काय होणार आहे याचा कठोर इशारा आहे. 1996-2001 च्या तालिबानच्या क्रूर राजवटीची आठवण अनेकांना आहे. महिलांना वारंवार मानवाधिकारांचे उल्लंघन, रोजगार आणि शिक्षण नाकारणे, बुरखा घालायला भाग पाडणे या प्रतिबंधांना महिलांना त्यावेळी सामोरे जावे लागले होते. पुरुष पालक किंवा महरामशिवाय त्यांचे घर सोडणे, त्यावेळी गुन्हा मानले जात. महिलांच्या हक्कांबाबत त्यांनी आपली भूमिका बदलली आहे, असे दावे असतानाच तालिबानच्या अलीकडील कृती आणि हजारो महिलांना लैंगिक गुलामगिरीत ढकलण्याचा नवीन हेतू त्याच्या दाव्यांच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply